Rajesh Shringarpura will appear in Daddy | ​राजेश शृंगारपुरे दिसणार डॅडीमध्ये

मराठीमधल्या अनेक चेहऱ्यांनी बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला अाहे. अनेक मराठी चेहऱ्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये अापल्या अभिनयाची छाप पाडली अाहे. अनेक चित्रपटात मराठी कलाकारांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आता आणखी एक मराठी चेहरा प्रेक्षकांना हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 
राजेश शृंगारपूरेने संघर्ष, स्वराज यांसारख्या कित्येक मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. झेंडा या चित्रपटात राजेश शृंगारपूरेने साकारलेली भूमिका खूपच गाजली होती. याच चित्रपटामुळे त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्याने मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सरकार राज, मर्डर थ्री यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे चांगले कौतुक झाले होते. आता तो पुन्हा एकदा एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे.
राजेश नेहमीच आपल्याला धडाकेबाज भूमिकेत दिसला अाहे. आता तो अर्जुन रामपालच्या डॅडी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
मराठी, हिंदीमध्ये छोटा अाणि मोठा पडदा गाजवल्यानंतर राजेशने दोन हॉलिवूड चित्रपटातही कामे केले अाहे. त्याच्या या चित्रपटांमधील अभिनयाची देखील चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे त्याच्या डॅडी या आगामी चित्रपटाकडून देखील प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत.
डॅडी या चित्रपटात राजेशची भूमिका काय असणार याबाबत त्याने मौन राखणेच पसंत केले आहे. पण या चित्रपटात तो एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले जात आहे. 
अर्जुन रामपालच्या डॅडी या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा असून हा चित्रपट कुख्यात डॉन अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित आहे.
डॅडी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Also Read : अर्जुन रामपालच्या डॅडीमधले हे गाणे तुम्ही ऐकलात का?
Web Title: Rajesh Shringarpura will appear in Daddy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.