Raj Thackeray wishes to give the film 'Prabhu Shivaji Raja' | ​'प्रभो शिवाजी राजा' चित्रपटाला राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास सचेतनपटाद्वारे नवीन पिढीपर्यंत पोहोचवणारा 'प्रभो शिवाजी राजा' हा सिनेमा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. १६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सचेतनपटास भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी देखील या सचेतनपटास पसंती दिली असून हा सिनेमा येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही व्यक्त केला.  
मराठी चित्रपटसृष्टीत आज अनेक नित्यनूतन प्रयोग होत आहेत. त्यातील अॅनिमेशनपटाचा पहिलाच प्रयोग साकारात 'प्रभो शिवाजी राजा' हा चित्रपट संपूर्ण राज्यभर प्रदर्शित झाला आहे. आमचे आराध्य दैवत आणि जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरतेच्या कथा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, त्यांच्या विचारांचे संस्कार व्हावेत यासाठी ही शिवगाथा नक्कीच उपयोगी ठरेल' असे गौरव उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. तसेच 'लहान मुलांसाठी लोकप्रिय अशा अॅनिमेशनपटाच्या माध्यमातून आपल्या थोरपुरुषांच्या गाथा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या उपक्रमास माझ्याकडून भरपूर शुभेच्छा' अशा शब्दांत त्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. निलेश मुळे दिग्दर्शित गणराज असोसिएट्स प्रस्तुत तसेच इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफाक निर्मित 'प्रभो शिवाजी राजा' या मराठी सचेतनपटास महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयंतीनिमित्त या सिनेमाद्वारे मानवंदना दिली जात आहे.
समीर मुळे यांची कथा, ख्यातनाम इतिहासकार निनाद बेडेकर यांचे संवाद आणि पटकथेचे साहाय्यक लेखन, शंकर महादेवन, स्वप्निल बांदोडकर, नंदेश उमप, उदेश उमप, श्रीरंग भावे यांची गाणी, डॉ.भरत बलवल्ली यांचे संगीत, नंदू घाणेकर यांचे पार्श्वसंगीत या सर्वांनी 'प्रभो शिवाजी राजा' हा अ‍ॅनिमेशनपट समृद्ध झालेला आहे.
मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सचिन खेडेकर, उमेश कामत, उदय सबनीस, अविनाश नारकर, उज्ज्वला जोग, सुषमा सावरकर, विजू माने, कुषल भद्रिके इत्यादींचा आवाज या अ‍ॅनिमेशनपटाला लाभला आहे. 

Also Read : ​प्रभो शिवाजी राजा या चित्रपटाच्या खास ध्वनीफितीचे अनावरण

Web Title: Raj Thackeray wishes to give the film 'Prabhu Shivaji Raja'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.