Rahul Deshpande gaane Vitthal in the song Shaptha | ​राहुल देशपांडे गाणार विठ्ठला शप्पथ या चित्रपटात

राहुल देशपांडे हे आज शास्त्रीय संगीतातील खूप मोठे नाव आहे. त्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत. त्यांची सगळीच गाणी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतात. त्यांची गाणी ऐकण्यासाठी रसिक नेहमीच आतुरलेले असतात. त्यांच्या अनेक स्टेज शोना रसिक भरभरून गर्दी करतात. यमन हा त्यांचा शास्त्रीय संगीत ते पॉप एक संगीतमय सफर हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूपच आवडतो. या कार्यक्रमाला नेहमीच लोक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. राहुल देशपांडे सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात. अनेकवेळा तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या फॅन्सना गाणी ऐकवत असतात. 
राहुल देशपांडे स्टेज शो करत असले तरी ते खूपच कमी चित्रपटांमध्ये गातात. कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व यांसारख्या चित्रपटातील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील त्यांची सगळीच गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. राहुल चित्रपटात कधी गाणार याची त्यांचे सगळे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. विठ्ठला शप्पथ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत पवार करत आहेत. या चित्रपटात एक विठ्ठलावर एक भक्तीगीत असणार आहे आणि हे भक्तीगीत राहुल देशपांडे गाणार आहेत. हे गीत प्रसिद्ध गीतकार मंगेश कांगणे यांनी लिहिले असून या गाण्याला चिनार-महेश या जोडीने संगीत दिले आहे. हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राहुल देशपांडे यांच्यासाठी गीत लिहायला मिळाल्यामुळे सध्या मंगेश प्रचंड खूश आहे. 
Web Title: Rahul Deshpande gaane Vitthal in the song Shaptha
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.