Pyaar Tera Hai Too was the actor of the film turned actor in Marathi cinema | ​प्यार तो होना ही था या चित्रपटातील हा अभिनेता वळला मराठी चित्रपटसृष्टीकडे

प्यार तो होना ही था हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील काजोल आणि अजय देवगण यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात राहुलच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना बिजॉय आनंदला पाहायला मिळाले होते. काजोलचा प्रियकर असलेला राहुल प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. बिजॉयच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाआधी बिजॉयने काही चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. यश चित्रपटात त्याच्यावर चित्रित झालेले सुबह सुबह जब खि़डकी खोलू... हे गाणे तर प्रचंड गाजले होते. बिजॉय प्यार किया तो डरना क्या या चित्रपटानंतर आपल्याल कधीच चित्रपटात दिसला नाही. बिजॉय गेल्या अनेक वर्षांपासून योगी बनला असून त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य हे योगसाधनेसाठी वाहून दिले होते. पण आता बिजॉय पुन्हा अभिनयक्षेत्राकडे वळला असून तो नुकताच प्रेक्षकांना एका मराठी चित्रपटामध्ये पाहायला मिळाला आहे. या चित्रपटात बिजॉयचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या समोर आला आहे. 
आजवर मराठीत अनेक खलनायक पाहायला मिळाले, त्यातले अनेक खलनायकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे आणि ते प्रेक्षकांच्या चांगले लक्षात देखील राहिले आहेत. असाच एक मराठी खलनायक संजय जाधव दिग्दर्शित येरे येरे पैसा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ये रे ये रे पैसा मधल्या विजय मेहरा या खलनायकाच्या भूमिकेत बिजॉय आनंद हा हिंदी पडद्यावरचा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 
बिजॉय आनंदचा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने या चित्रपटाबद्दल तो खूपच उत्सुक होता. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. मराठी चित्रपटातले अनेक व्हिलन्स आजवर त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे लोकांच्या चांगलेच लक्षात राहिले. खलनायकाच्या भूमिकेतील बिजॉय आनंद देखील लोकांच्या कायम लक्षात राहील असा या चित्रपटाच्या टीमला विश्वास आहे. बिजॉयचे व्यक्तिमत्त्व अतिशय डॅशिंग असून त्याच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगला खलनायक मिळाला असल्याचे या चित्रपटाच्या टीमचे म्हणणे आहे. 
बिजॉय १७ वर्षं अभिनयक्षेत्रापासून दूर होता. काही वर्षांपूर्वी त्याने सिया के राम या मालिकेत जनकाची भूमिका साकारली होती. 

Also Read : ​'ये रे ये रे पैसा' सिनेमाचे कलाकार दिसले सेलिब्रेशन मुडमध्ये,असा साजरा केला आनंद
Web Title: Pyaar Tera Hai Too was the actor of the film turned actor in Marathi cinema
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.