'Pyaar To Hain Ho Thi' is a famous actor from the film, married to a Marathi actress! | 'प्यार तो होना ही था' या चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्याने केले आहे या मराठी अभिनेत्रीशी लग्न!

'प्यार तो होना ही था' हा चित्रपट प्रचंड गाजला होता.या चित्रपटातील काजोल आणि अजय देवगण यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात राहुलच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना बिजॉय आनंदला पाहायला मिळाले होते. काजोलचा प्रियकर असलेला राहुल प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. बिजॉयच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाआधी बिजॉयने काही चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. यश चित्रपटात त्याच्यावर चित्रित झालेले सुबह सुबह जब खि़डकी खोलू... हे गाणे तर प्रचंड गाजले होते.बिजॉय 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटानंतर आपल्याला कधीच चित्रपटात दिसला नाही.बिजॉय गेल्या अनेक वर्षांपासून योगी बनला असून त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य हे योगसाधनेसाठी वाहून दिले होते.आज आम्ही तुम्हाला बिजॉय आनंद विषयी खास गोष्टी सांगणार आहोत.सगळ्यात आधी ते म्हणजे मराठी अभिनेत्री सोनाली खरे हिचा बिजॉय आनंद हा नवरा असल्याचे फार कमी जणांना माहिती आहे.दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते.दोघेही अनेक वर्षापासून नात्यात होते.त्यानंतर दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.सोनालीनेही नंतर फॅमिलीला वेळ देता यावा यासाठी काही काळासाठी अॅक्टींगमधून ब्रेक घेतला होता.नुकतेच सोनाली खरे 'हृदयांतर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात तिच्या भूमिकेचेही कौतुक झाले.आता पत्नी सोनालीप्रमाणे बिजॉय आनंदही मराठी 'येरे येरे पैसा' सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकले.बिजॉय आनंद यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे ज्यात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे.मराठी सिनेमातले अनेक व्हिलन्स आजवर लोकांच्या खूप चांगले लक्षात राहिले ते त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे. बिजॉय आनंद हा असाच एक चेहरा जो खलनायकाच्या भूमिकेत लोकांच्या चांगलाच लक्षात राहतो.अगदी डॅशिंग असं व्यक्तिमत्व असलेले हा मराठीला लाभलेला नवीन चेहरा रसिकांनाही फारच आवडला.

Also Read:अशी रंगली या कलाकारांची पार्टी,समोर आले फोटो

नुकतेच 'येरे येरे पैसा'मधले सिनेमाच्या कलाकारांनी सिनेमाला मिळालेल्या यशाचे सेलिब्रेशन केले.या पार्टीला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती.सई ताम्हणकर,अमृता खानविलकर,अंकुश चौधरी,हर्षदा खानविलकर,सिद्धार्थ जाधव,उमेश कामत,तेजस्विनी पंडित अशा कलाकारांनी पार्टीत हजेरी लावली होती.

Web Title: 'Pyaar To Hain Ho Thi' is a famous actor from the film, married to a Marathi actress!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.