पुष्कर श्रोत्रीची अमेरिकावारी,सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 03:34 PM2018-09-19T15:34:42+5:302018-09-19T15:37:54+5:30

पुष्कर श्रोत्रीच्या या फोटोंवर त्याच्या फॅन्स आणि मित्रपरिवाराकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

Pushkar America, special photos shared on social media! | पुष्कर श्रोत्रीची अमेरिकावारी,सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो !

पुष्कर श्रोत्रीची अमेरिकावारी,सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो !

googlenewsNext

मराठी सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. अभिनयासोबत नुकतंच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे. त्याने निर्मिती आणि दिग्दर्शित केलेल्या उबुंटू या मराठी सिनेमाला रसिकांनी डोक्यावर घेतलं. शिवाय या सिनेमाने विविध पुरस्कार सोहळे आणि चित्रपट महोत्सवात छाप पाडली. सिनेमासोबतच पुष्कर मालिका आणि नाटकांमध्येही तितकाच बिझी आहे. नुकतंच त्याची प्रमुख भूमिका असलेल्या 'आम्ही आमचे बाप' या नाटकाचे अमेरिकेत तीन विशेष प्रयोग पार पडले. या नाटकाच्या प्रयोगाला अमेरिकेतल्या नाट्य रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अमेरिकेत असलेल्या पुष्करने इथल्या खास पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधीही दवडली नाही. सॅनफ्रान्सिस्को, गोल्डन गेट ब्रिज, सी लायन्स, फेसबुक मुख्यालयसह विविध स्थळांना भेट दिली. याचे फोटो आणि व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केले आहेत. पुष्करच्या या फोटोंवर त्याच्या फॅन्स आणि मित्रपरिवाराकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

अभिनेता पुष्कर श्रोत्री उबुंटू या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळला आहे. त्याचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. शाळा आणि लहान मुले हे दोन्ही माझे अगदी जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यामुळेच 'उबुंटू' या चित्रपटाद्वारे एक दिग्दर्शक म्हणून मी माझ्या नव्या इनिंगला सुरुवात केली. एका छोट्याशा गावातील शाळकरी मुले आपली शाळा वाचवण्यासाठी काय काय करतात याचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट आणि या चित्रपटातील सगळेच कलाकार, बालकलाकारांचा अभिनय खूप पसंतीस पात्र ठरला होता.

या चित्रपटाच्या शूटींग दरम्यानचे किस्से सांगताना पुष्करने सांगितले की, कुडाळमध्ये चित्रीकरण करताना तर मुले खूपच खूश होती. त्यांच्यासाठी हे चित्रीकरण म्हणजे एक प्रकारची पिकनिक होती. चित्रीकरण नसले की मुले गावात फिरायची, तिथे असलेल्या नदीत कागदाच्या होड्या करून सोडायचे.सगळ्या मुलांनी चित्रीकरण करताना खूप चांगली साथ दिली. मुली तर खूपच समजुतदार असतात हे मला या चित्रपटाच्या चित्रीकरणातून कळले आहे. कोणता मुलगा मस्ती करत असेल तर त्या लगेचच त्याला समजवायच्या. सांगलीमध्ये तर आम्ही भर रस्त्यात चित्रीकरण केले आहे. लोकांनी मला ओळखू नये म्हणून मी मास्क घालून देखील फिरत असे. पण एकंदरीत चित्रीकरणाचा अनुभव खूपच छान होता. 

Web Title: Pushkar America, special photos shared on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.