Produced Sawant and Kamlesh Sawant celebrated Rakshabandhan | ​निर्मिती सावंत आणि कमलेश सावंतने साजरे केले रक्षाबंधन

मला काहीच प्रॉब्लेम नाही चित्रपटात भाऊ-बहिणीची भूमिका साकाराणारे अभिनेते कमलेश सावंत आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी रिल लाईफ नाते रिअल लाईफमध्ये निभावून प्रेमाची नाती कुठेही जुळतात याचे प्रात्यक्षिकच दिले जाते. रक्षाबंधनच्या निमित्ताने निर्मिती ताईने कमलेश सावंत यांना राखी बांधत स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी सोपवलेली आहे.
भाऊ-बहिणीचे नाते हे प्रेमाच्या नितळ आणि निखळ आठवणींनी भरलेले असते. मला काहीच प्रॉब्लेम नाही चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भेटलेले अभिनेते कमलेश सावंत आणि अभिनेत्री निर्मिती सावंत ऑनस्क्रीन भाऊ-बहीणची भूमिका साकारत असताना ऑफस्क्रीन देखील मजा-मस्ती करत भाऊ-बहिणीच्या भूमिकेतच वावरत असल्याचे दिग्दर्शक समीर विद्वांस सांगतात. इतकी गोड, प्रेमळ आणि नटखट बहीण असेल तर या बहिणाच्या मायेपासून कोण कसे दूर राहू शकेल? टार्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटाच्या सेटवर निर्माण झालेले हे नाते चित्रीकरणानंतरही टिकून आहे. म्हणूनच रक्षाबंधनाच्या निमित्ताने या गोंडस अशा बहिणीच्या मायेसाठी वेळात वेळ काढून अभिनेते कमलेश सावंत यांनी आपल्या बहिणीला म्हणजेच निर्मिती ताईला तिच्या झी मराठीवरील जाडूबाई जोरात मालिकेच्या सेटवर जाऊन सरप्राईज दिलेले आहे. 
या गोड नात्यातल्या धाकाची जाणीव करून देताना अभिनेते कमलेश सावंत सांगतात, या बहीण-भावाच्या नात्याची सुरुवात मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटातून झाली. नको तिथे नको ते बोलणाऱ्या भावाला आपल्या धाकात ठेवणारी ही बहीण... तिने ऑनस्क्रीन बरोबरच ऑफस्क्रीनदेखील आपल्या भावाला (मला) सांभाळून घेतले. या बहीण-भावाच्या संवादात होणारे हलके-फुलके विनोद तुम्ही चित्रपटात पाहू शकणार आहात.
तेव्हा बंधन असूनही बंधन न वाटणाऱ्या या नटखट नात्याचा प्रेमळ प्रवास अनुभवण्यासाठी निर्माते पी.एस.छतवाल, रिचा सिन्हा आणि रवी सिंग निर्मित आणि दिग्दर्शक समीर विद्वांस दिग्दर्शित मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट पाहायला विसरू नका येत्या ११ ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
तर आपल्या प्रॉब्लेम्सवर तोडगा शोधण्यासाठी नक्की जा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत्या ११ ऑगस्टला...

Also Read : म्हणून रिअल लाइफमध्ये या अभिनेत्याला कॅट म्हणते ‘भैय्या म्होरे राखीं के बंधन को.....’
Web Title: Produced Sawant and Kamlesh Sawant celebrated Rakshabandhan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.