The problem that Rajesh Shringarpur had to do when he left Bigg Boss | बिग बॉसमधून बाहेर पडताच राजेश शृंगारपुरेला करावा लागला या गोष्टीचा सामना

भारदस्त आवाज,मजबूत शरीरयष्टी आणि दिसायला पण छान असलेला शिवाय बिग बॉस मराठी मधून प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे राजेश शृंगारपुरे.याच अभिनेत्याच्या आयुष्यात सध्या खूप गडबड झाली आहे.. अहो खरंच.. पण बिग बॉसची नव्हे, ही वेगळीच गडबड आहे. 'गडबड झाली' नावाचा त्यांचा नवीन सिनेमा १ जून रोजी प्रदर्शित होत आहे.यात राजेश शृंगारपुरे यांची मुख्य नायकाची भूमिका आहे.सिनेमाबद्दल राजेश सांगतात की, चित्रपटात उषा नाडकर्णी माझी आजी आहे, आणि ही आजी तशी खूपच हट्टी आहे. सध्या तिने माझ्या लग्नाचा हट्ट धरला आहे. तिची इच्छा आहे की, मरण्याआधी त्यांना त्यांच्या सुनेचं तोंड बघायचं आहे.त्यामुळे तिचे सर्व प्रयत्न सुरू असतात.खरंतर आजीमुळे मला लग्न करावं लागतं. कसंबसं लग्न होतं.. पण लग्नाच्या वेळी अशी काहीतरी गडबड होते की संपूर्ण गोष्टच बदलून जाते. नंतर सिनेमात विकासचं काय होतं. अशी गडबड गोंधळने परिपूर्ण आणि मज्जा मस्ती असलेला सिनेमा म्हणजे 'गडबड झाली'.

या सिनेमाचे शूट चालू असताना घडलेला एक किस्सा राजेश शृंगारपुरे यांनी सांगितला,पालघरला शूटसाठी जात असताना अचानक त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर झोपून गेला.विशेष म्हणजे कोणाचच लक्ष नव्हतं आणि मध्येच जोरात हॉर्न वाजला तेव्हा सगळ्यांच्या ही बाब लक्षात आली. आणि मग त्या नंतर त्या ड्रायव्हरला चहा-पाणी देऊन त्याची झोप घालवली आणि नंतर विकास पाटील यानेच पूर्ण गाडी चालवली असे मजेदार किस्से आणि मज्जा करत करत या सिनेमाचे शूट पूर्ण झाले. तर असा हा सिनेमा १ जूनला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.. प्रांजली फिल्म प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. जितेंद्र राठोड निर्मित, संतराम दिग्दर्शित या सिनेमात राजेश शृंगारपुरे, नेहा गद्रे, विकास पाटील, उषा नाडकर्णी, मोहन जोशी, संजय मोहिते, हर्षा गुप्ते, प्रमोद शिंदे, निरंजन नलावडे, हर्षी शर्मा, प्रतिभा यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाला रमेश रोशन यांचे संगीत लाभले आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो.तसंच या आठवड्यामध्ये देखील कोणा एकाला घराबाहेर जावं लागणार आहे.या आठवड्यामध्ये जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस हे डेंजर झोनमध्ये आले, आणि राजेशला घराबाहेर जावं लागलं. राजेश घराबाहेर पडल्याचे दु:ख सगळ्यांच झाले. रेशम, उषा नाडकर्णी, सुशांत, आस्ताद, जुई, भूषण खूप भावुक झाले.नेहमीप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी राजेशला देखील मिळाली तेव्हा राजेशने घरातील काही सदस्यांना तर काही सदस्यांनी त्याच्या जवळ त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण नवा कॅप्टन बनेल ? कोणते टास्क सदस्यांना मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. 
Web Title: The problem that Rajesh Shringarpur had to do when he left Bigg Boss
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.