प्रिया बापट झळकणार ह्या हिंदी वेबसीरिजमध्ये, दिसणार वेगळ्याच अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:54 PM2019-04-05T18:54:45+5:302019-04-05T19:04:38+5:30

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट लवकरच हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

Priya Bapat will be seen in this Hindi webcinema, a different issue will appear | प्रिया बापट झळकणार ह्या हिंदी वेबसीरिजमध्ये, दिसणार वेगळ्याच अंदाजात

प्रिया बापट झळकणार ह्या हिंदी वेबसीरिजमध्ये, दिसणार वेगळ्याच अंदाजात

googlenewsNext
ठळक मुद्देहिंदी चित्रपटानंतर प्रिया आता दिसणार हिंदी वेबसिरीजमध्ये

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट लवकरच हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स' असे या वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या आणि प्रियाच्या अवतीभवती फिरणाऱ्या या वेब सीरिजमध्ये तिच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू उलगडणार आहेत.

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने चारचाँद लावले आहेत. 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे  प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.


हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवेल, यात शंकाच नाही. ॲप्लॉज एंटरटेन्मेंटची निर्मिती आणि नागेश कुकुनूर यांचे दिग्दर्शन असणाऱ्या  'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसिरीज लवकरच हॉट स्टारवर प्रदर्शित होणार आहे.


 मायानगरी हे राजकीय नाट्य असून यात सत्तेसाठीची चढाओढ पहायला मिळणार आहे. यात प्रियासोबत अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, एजाज खान व सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजचे दहा एपिसोड प्रसारीत होणार आहे.

याबाबत प्रियाने सांगितले की, यापूर्वी मी केलेल्या भूमिकांपेक्षा  'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील माझी व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. या मालिकेतील इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप वेगळा होता. नागेश कुकुनूर हे उत्तम दिग्दर्शक आहेत. माझ्या भूमिकेच्या अंतरंगात खोलवर शिरण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा मला फार उपयोग झाला. माझी या सीरिजमधील भूमिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.

Web Title: Priya Bapat will be seen in this Hindi webcinema, a different issue will appear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.