'दादा मी प्रेग्नेंट'चे कोड उलगडलं, प्रिया बापट आणि उमेश कामत लवकरच येणार रंगमंचावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 10:12 AM2018-12-03T10:12:27+5:302018-12-03T10:20:03+5:30

आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते जे पुण्यात आणि मुंबईत 'दादा मी प्रेग्नेंट' आहे या होर्डिंगशी प्रिया बापटशी संबंधीत आहे

Priya Bapat and Umesh Kamat will soon get together on stage | 'दादा मी प्रेग्नेंट'चे कोड उलगडलं, प्रिया बापट आणि उमेश कामत लवकरच येणार रंगमंचावर

'दादा मी प्रेग्नेंट'चे कोड उलगडलं, प्रिया बापट आणि उमेश कामत लवकरच येणार रंगमंचावर

googlenewsNext
ठळक मुद्दे   नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्स घेऊन येत आहे एक नवंकोरं नाटक "दादा,एक गुड न्युज आहे.

आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते जे पुण्यात आणि मुंबईत दादा मी प्रेग्नेंट आहे या होर्डिंगशी प्रिया बापटशी संबंधीत आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया बापट हिनेदेखील सोशल मीडियावर एक गुड न्युज आहे अशी पोस्ट शेअर केली होती. दादरच्या प्रभादेवी परिसरातही "दादा, मी प्रेग्नन्ट आहे.” असे होर्डिंगही लावण्यात आले होते.

          नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्स घेऊन येत आहे एक नवंकोरं नाटक "दादा,एक गुड न्युज आहे." नुकतेच  ह्या नाटकाचे  पोस्टर सोशल नेटवर्किंग साईट वर रिलीज करण्यात आले. बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला ह्या नाटकाद्वारे पाहायला मिळेल. उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही भावा बहिणीची जोडी आपल्याला या नाटकात दिसणार आहे. उमेश ह्या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि  कल्याणी पाठारे लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे.

Web Title: Priya Bapat and Umesh Kamat will soon get together on stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.