Prayers will start on the date of 'Beats' wedding | अखेर या तारखेला लागणार प्रार्थना बेहरेचं ‘व्हॉट्सअप लग्न’

‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटातील वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे ही हिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘व्हॉट्सअप लग्न’ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा वैभव-प्रार्थनाची केमिस्ट्री अनुभवता येईल.‘नटसम्राट’ चे निर्माते विश्वास जोशी आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते नानू जयसिंघानी यांनी प्रथमच एकत्र येत ‘व्हॉट्सअप लग्न’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ म्हणजेच पुढल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे.हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याप्रमाणे वर्षभर किंवा सहा महिने आधीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्याची परंपरा आहे, त्याप्रमाणेच ‘व्हॉट्सअप लग्न’च्या निर्मात्यांनीही जवळजवळ चार महिने अगोदर म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करीत सुनियोजित पद्धतीने चित्रपट प्रदर्शित करण्याचा संदेश दिला आहे.म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाचं कर्णमधूर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं हा देखील यामागचा हेतू आहे.प्रदर्शनाची तारीख अगोदर घोषित केल्याने ऐन वेळी होणारा तारखांचा घोळ टाळता येईलच, पण त्यासोबतच चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मुबलक वेळ मिळेल हा एक महत्त्वपूर्ण विचारही ‘व्हॉट्सअप लग्न’ च्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे ‘नटसम्राट’ या चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं असून, पोस्ट प्रोडक्शनचं काम लवकरच पूर्ण होईल.

Also Read:​वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरेची जोडी पुन्हा जमली

प्रार्थनाच्या रिल लाईफ  व्हॉट्सअप लग्न हे पुढच्या वर्षी लागणार असले तरीही रिअल लाईफ लग्न मात्र 14 नोव्हेंबरला लागणार आहे.दिग्दर्शक अभिषेक जावकरसह ती लग्नबंधनात अडकणार आहे.विशेष म्हणजे प्रार्थना आणि अभिषेक डेस्टीनेशन वेडींग करणार असल्यामुळे सध्या ती चांगल्या लोकेशनच्या शोधात आहे.प्रार्थनाचे लग्न अरेंज असून एका मॅरेज ब्यूरोच्या मदतीने तिची आणि अभिषेकची ओळख झाली.अभिषेकच्या आवडी निवडी आणि ब-याच गोष्टी खूप कॉमन असल्यामुळे तो चांगला जोडीदार ठरू शकतो त्यामुळे अभिषेकला पसंत केल्याचे प्रार्थनाने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.सध्या दोघेही लग्नाच्या तयारीत बिझी आहे.
Web Title: Prayers will start on the date of 'Beats' wedding
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.