Prayer is good in hostel days | ​हॉस्टेल डेजमध्ये झळकणार प्रार्थना बेहरे

हॉस्टेल डेज या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय नाईक करत आहेत. त्यांनी बावरे प्रेम हे, लग्न पहावे करून, सतरंगी रे यांसारख्या चित्रपटांचे लेखन केले आहे. हॉस्टेल डेज या चित्रपटाची कथादेखील त्यांचीच आहे. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाची घोषणा केली होती. तसेच या चित्रपटाचे पहिले पोस्टरदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आणले होते. या पोस्टरवर आयुष्यातले सगळ्यात मस्त क्षण अशी टॅगलाइन आपल्याला पाहायला मिळाली होती. या चित्रपटाद्वारे नव्वदच्या दशकातील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला काळ या चित्रपटामुळे तुम्हाला पुन्हा आठवणार आहे यात काही शंका नाही असे त्यांनी चित्रपटाची घोषणा करताना म्हटले होते.
हॉस्टेल डेज या चित्रपटाची घोषणा मे महिन्यात करण्यात आली होती आणि केवळ एका महिन्यात त्यांनी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना प्रार्थना बेहरे एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्रार्थना एक खूप चांगली आणि प्रोफेशनल अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करायला मजा आली असे अजय नाईक यांनी म्हटले आहे. यासोबतच विद्याधर जोशीदेखील या चित्रपटात आहेत. विद्याधर जोशी यांच्यासोबत अजय यांचा हा तिसरा चित्रपट आहे. त्यांनी याआधी सतरंगी रे आणि बावरे प्रेम हे या चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक संजय जाधव या चित्रपटात अभिनय करत आहेत. त्यांचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण रेवदंडा येथे करण्यात आले आहे. तसेच या चित्रपटाचे काही चित्रीकरणदेखील अलिबागमध्ये झाले आहे. या चित्रपटातील गाणी देखील खूप सुंदर असून या गाण्यांसाठी अवधूत गुप्ते, गुरू ठाकूर अशी तगडी टीम एकत्र आली आहे. 
Web Title: Prayer is good in hostel days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.