Prayer Behera and Aniket Vishwasrao's car hit a fatal accident, serious injury to prayer | प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला झाला भीषण अपघात, प्रार्थनाला झाली गंभीर दुखापत

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात झाला आहे. हे दोघे आपल्या आगामी चित्रपट 'मस्का'च्या प्रमोशनसाठी जाताना हा अपघात झाला आहे. कोल्हापूरच्या दिशेने जाताना लोणावळा इथे हा अपघात झाल्याचे कळतेय. 

अपघाताच्यावेळी अनिकेत, प्रार्थना आणि प्रार्थनाची असिस्टंट आणि ड्रायव्हर गाडीत होते.  या अपघातात प्रार्थना बेहेरेच्या हाताला दुखापत झाली आहे तर तिच्या असिस्टंच्या डोक्याला मार लागला आहे.  प्रार्थना आणि अनिकेत यांच्या गाडी टेम्पोला जाऊन धडकली आणि त्यामुळे हा अपघात झाला. रस्त्याच्या डाव्या बाजूने यांची गाडी जात असतानाच अचानकच बंद पडलेला टेम्पो समोर आला आणि त्या टेम्पोपासून वाचण्यासाठी ड्रायव्हरने कार वळवली पण, त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हा अपघात झाल्याने प्रार्थनाला काही काळ आराम करावा लागणार आहे. ‘मस्का’ हा चित्रपट रॉमकॉन शैलीचा आहे. आजवर सोज्ज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘मस्का’ नेक्स्ट डोअरच्या बोल्ड भूमिकेत दिसणार आहे. या कथेत स्त्री पात्राची भूमिका जबरदस्त, धमाल आणणार आहे. या शिवाय अभिनेते शशांक शेंडे, विद्याधर जोशी आणि प्रणव रावराणे हे कलाकार देखील या चित्रपटात आहे.‘मस्का’ मध्ये वेगवेगळी नावे वापरून पुरुषांची फसवणूक करणारी एक स्त्री असल्याचे दिसते ती नेमकी कोण? याचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे. ‘मस्का’ या चित्रपटाचे कथा लेखन आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेते प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. लेखक, अभिनेता, नाट्यदिग्दर्शक असलेले प्रियदर्शन जाधव या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. 
Web Title: Prayer Behera and Aniket Vishwasrao's car hit a fatal accident, serious injury to prayer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.