प्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:43 PM2018-12-13T17:43:18+5:302018-12-13T17:44:14+5:30

प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.

This Is Prajakta Mali's Supercool Power, Shares Hot And Sexy Photo | प्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो

प्राजक्ता माळीची ही आहे ‘सुपरपॉवर’, सोशल मीडियावर शेअर केला हॉट सेक्सी फोटो

googlenewsNext

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा आणि आकर्षणचा विषय ठरला आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिचा हा फोटो तुम्हालाही नक्कीच घायाळ करेल. या फोटोला तिनं सुंदर कॅप्शनही दिले आहे. नारीशक्ती आणि सुपरपॉवर याबाबतचा एक संदेश तिने या कॅप्शनमधून दिला आहे.

एक दूरदृष्टी असलेली सशक्त महिला बनायचं आहे, ह्द अंतःकरणाची असली तरी खंबीर तसंच सामर्थ्यवान, स्वतःबद्ल जाणीव असणारी, दृढ निश्चयी, आदर करणारी आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणारी... मी एक महिला... तुमची सुपर पॉवर काय आहे? असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.  तिच्या या फोटोला बरेच लाइक्स आणि कमेंट्स मिळू लागल्या आहेत. या फोटोत फ्लॉरल काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ताचा अंदाज हॉट आणि तितकाच ग्लॅमरस असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधीही तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोमध्ये पारंपरिक अंदाज आणि हॉट तसंच घायाळ करणारा लूकही रसिकांना पाहायला मिळतो.  

Web Title: This Is Prajakta Mali's Supercool Power, Shares Hot And Sexy Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.