Prajakta Mali and Lalit Prabhakar pair will be seen again | ​प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकरची जोडी पुन्हा झळकणार

प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांची जोडी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत झळकली होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. पण या मालिकेनंतर ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाली नाही. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे कळतेय. 
प्राजक्ता माळी सध्या झी मराठी वरील नकटीच्या लग्नाला सावधान या मालिकेत झळकत आहे तर ललितचा चि. व चि. सौ. कां हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. ललित या चित्रपटानंतर तुझं तू माझं मी या चित्रपटातही दिसला होता. आता ललित पुन्हा एकदा चित्रपटात झळकणार असून त्याच्यासोबत प्राजक्ता देखील काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. प्राजक्ता माळीनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला तिच्यासोबत ललित प्रभाकर आणि प्रकाश कुंटे दिसत आहेत. प्रकाश कुंटे यांनी कॉफी आणि बरेच काही, & जरा हटके यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या फोटोसोबत प्राजक्ताने एक पोस्ट देखील लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या आगामी चित्रपटासाठी नुकतेच डबिंग केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले आहे. फोटोत तुम्हाला ते गोड हसताना दिसत आहेत तेच प्रकाश आहेत. मी त्यांना ज्युनिअर इम्तियाज अली अशी हाक मारते. मी आजवरच्या माझ्या करियरमधील सर्वात चांगले डबिंग केले असून ते केवळ प्रकाश यांच्यामुळे शक्य झाले. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि माझ्यातील गुणांना वाव दिल्याबद्दल धन्यवाद...


 

Also Read : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा हा घायाळ करणारा अंदाज तुम्ही पाहिलाय का?
Web Title: Prajakta Mali and Lalit Prabhakar pair will be seen again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.