​स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेच्या फॅनने राबवला हा स्तुत्य उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 10:53 AM2018-06-21T10:53:08+5:302018-06-21T17:37:16+5:30

स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे गेली अनेक वर्षं मराठी इंडस्ट्रीत असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्यांचा ...

This Praiseworthy venture is implemented by the fan of Swapnil Joshi and Mukta Barve | ​स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेच्या फॅनने राबवला हा स्तुत्य उपक्रम

​स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वेच्या फॅनने राबवला हा स्तुत्य उपक्रम

googlenewsNext
वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे गेली अनेक वर्षं मराठी इंडस्ट्रीत असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्यांचा मुंबई पूणे मुंबई हा चित्रपट तर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा चित्रपट देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटासोबतच मुक्ता आणि स्वप्निलने एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत काम केले होते. ही मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. स्वप्निल आणि मुक्ताच्या हजारो फॅन्सने मिळवून रावा नावाचे एक कुटुंब बनवले आहे. 
स्वप्निल आणि मुक्ताच्या या रावा नावाच्या कुटुंबाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. आपण समाजाचा एक भाग असतो. त्यामुळे समाजाचे आपण देणे लागतो. समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही तरी करण्याची गरज असते. याच विचाराने रावाने एक छत्री माणुसकीची हा एक उपक्रम राबवला आहे. पावसाळा जवळ आला की, आपण प्रत्येक जण छत्री, रेनकोट यांची शॉपिंग करायला लागतो. काही वेळा तर गेल्या वर्षीची आपली छत्री, आपला रेनकोट चांगला असला तरी नवीन घेण्याकडे आपला कल असतो. बाजारात नवीन ट्रेंड आला की, त्याप्रमाणेच आपली छत्री, रेनकोट असला पाहिजे असे सगळ्यांना वाटत असते. पण काही रस्त्यावर राहाणाऱ्या, भीक मागून आपले आयुष्य जगणाऱ्या, दोन वेळेचे खाणे मिळणे देखील मुश्कील असणाऱ्या लोकांकडे छत्री घेण्याची ऐपत नसते. अशा लोकांना आपण वापरत नसलेली छत्री अथवा रेनकोट दिला तर पावसापासून त्यांचा बचाव होऊ शकतो. त्यामुळे रावा कुंटुंबाने एक छत्री माणुसकीची या उपक्रमाद्वारे अशा गरजू लोकांना आपली छत्री, रेनकोट देण्याचे आवाहन केले आहे आणि या कार्यात लोक मोठ्या प्रमाणात मदत देखील करत आहेत. तुमची देखील इच्छा असल्यास तुमच्याकडील एखादी छत्री, रेनकोट देऊन तुम्ही देखील या चांगल्या उपक्रमात आपला नक्कीच हातभार लावू शकता. 
लोकांनी अधिकाधिक या उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, तेजश्री प्रधान, समीधा गुरू यांसारख्या सेलिब्रेटींनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेले आहे. 

Also Read : ​स्वप्निल जोशी आणि त्याची गोंडस मुलगी मायराचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

Web Title: This Praiseworthy venture is implemented by the fan of Swapnil Joshi and Mukta Barve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.