Poster maker Avinash Gowarikar posters photoshoot of 'Junk' | 'दंगल,' 'जुडवा २'चे पोस्टर मेकर अविनाश गोवारीकरने केले या मराठी सिनेमाचे पोस्टर फोटोशूट!

सिनेमाप्रमाणेच सिनेमाचे पोस्टरही खूप महत्त्वाचे असते. पोस्टर जितके क्रिएटीव्ह तितकेच ते लक्षवेधी ठरते.त्यामुळेच संज जाधव यांच्या आगामी  ये रे ये रे पैसा  सिनेमाचे पोस्टरवर खूप मेहनत घेण्यात आली आहे. बॉलिवूडचे प्रसिध्द पोस्टर मेकर अविनाश गोवारीकरनेही या सिनेमाचे खास पोस्टरसाठी खास कलाकारांचे हावभाव कॅमे-यात टिपले आहेत.खुद्द अविनाश गोवारीकरने आपल्या सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, उमेश कामत, आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार दिसत आहे. विशेष म्हणजे या कलाकारांचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतायेत. येत्या ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होणार आहे. अविनाश गोवारीकरने  बॉलिवूडमध्ये सुपरहिट 'दंगल' , 'जुडवा २', 'मुबारका', 'बद्रीनाथ कि दुल्हनिया' अशा एक ना अनेक बॉलिवूड चित्रपटांची पोस्टर्स बनवले आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान असे मोठे कलाकार असोत किंवा वरून धवन,आलिया भट्ट सारखे सध्याचे तरुण कलाकार असोत, प्रत्येकालाच अविनाश गोवारीकर यांनी आपल्या कॅमेरातून उत्तम टिपले आहे. सिनेमातल्या कलाकरांना सिनेमाची कथा कोणी लिहीली आहे यासाठी उत्सुकता जास्त असल्याचे पाहायला मिळते.मात्र आता त्याचबरोबर सिनेमाचे पोस्टर अविनाश करणार असल्याचे कळताच त्यांची सिनेमाला घेवून अधिक उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते.नुकतेच  संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ ह्या चित्रपटाचे खास पोस्टरसाठी अनोखे फोटोशूट केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरसाठी गोवारीकरांनी वेगवेगळ्या थीमनुसार हे क्रिएटीव्ह बनवले आहे.दिग्दर्शक संजय जाधवच्या अफलातून कल्पनेतून खूपच वेगळ्या प्रकारे हे फोटोशूट झाले आहे. अविनाश गोवारीकारांसोबत काम करण्याचा अनुभव चित्रपटाच्या कलाकारांसाठी नक्कीच खूप रंजक होता. गोवारीकरांनी पोस्ट केलेल्या फोटोतून हा उत्साह आपल्याला नक्कीच जाणवतो. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, उमेश कामत, आणि सिद्धार्थ जाधव अशी चित्रपटाची स्टारकास्ट तर तगडी आहेच. परंतू आता चित्रपटाचे पोस्टरही  खास ठरणार असल्याचे संजय जाधव यांनी सांगितले.

संजय यांचा 'गुरू' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. 'गुरू' आणि 'ये रे ये रे पैसा' या दोन चित्रपटांच्या दरम्यान तब्बल दीड वर्षांचे अंतर आहे.त्यामुळे या काळात संजय जाधव काय करत आहेत. त्यांचा कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याची उत्सुकता लोकांना लागलेली होती. पण आता त्यांचा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.'गुरू' हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता.विशेष म्हणजे या सिनेमासाठी संजय जाधव यांनी वेगवेगळे प्रयोग करत असल्याचे पाहायला मिळतंय. या सिनेमाच्या एका सीन साठी त्यांनी चक्क 60 कॅमे-यांचा वापर करत या सीनचे चित्रकरण करण्यात आले होते. त्यामुळे हा सिनेमा रूपेरी पडद्यावर रसिकांचे मनोंरजन करण्यात कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Web Title: Poster maker Avinash Gowarikar posters photoshoot of 'Junk'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.