Popat Lal's 'Heroine' caught in a relationship with Maratha actor | मराठमोळ्या अभिनेत्यासह लग्नबंधनात अडकली पोपटलालची ‘ही’ हिरोईन,समोर आले लग्नाचे फोटो

सिनेसृष्टीत काम करता करता कलाकारांची ओळख होऊन ते आयुष्याचे जोडीदार बनल्याची अनेक उदाहरणं आहेत.यांत अभिनेता संग्राम साळवी आणि खुशबू तावडेची भर पडली आहे. चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या सांजबहरमध्ये खूशबु आणि संग्राम एकत्र काम करता करता दोघांची ओळख झाली.या ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत झालं. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.5 मार्चला हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. मोठ्या थाटात पारंपारीक विवाह पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला.यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.या लग्नसोहळ्याला दोघांचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.या नवदाम्पत्याच्या विविध अदा,लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी खशबू आणि संग्रामचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत हा शानदार विवाहसोहळा पार पडला.या सोहळ्यानंतर खुशबू आणि संग्रामने शानदार फोटोसेशनसुद्धा केले.यावेळी या नवदाम्पत्याच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.नव वधुच्या वेषात सजलेली नवी नवरी खुशबू लग्नात अतिशय सुंदर दिसत होती.गेल्या वर्षी आपल्या नात्याला जन्मोजन्मीच्या बंधनात बदलण्याचा निर्णय या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला.त्यानंतर दोघांनी अत्यंत साधेपणाने साखरपुडा केला होता.खुशबूप्रमाणेच संग्रामदेखील मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. 'देवयानी' या मालिकमुळे संग्राम साळवी घराघघरात पोहचला.खुशबू तावडे हे नाव केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीतदेखील तितकेच प्रसिद्ध आहे. 'तू भेटशी नव्याने', 'पारिजात' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले असून 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'सिंहासन बत्तीसी' यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे. तिने 'तेरे बीन' या मालिकेत काम केले होते. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.  आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे मराठी मनोरंजन दुनियेतील अनेक अभिनेता आणि अभिनेत्री नुकतेच रेशीमगाठीत अडकले आहेत. प्रार्थना बेहरे, सानिका अभ्यंकर, रोहन गुजर, सागरिका घाटगे,आरोह वेलणकर अशी सिनेसृष्टीतील विविध कलाकार रेशीमगाठीत अडकले आहेत.त्यामुळे या यादीत खूशबु आणि संग्राम यांचेही नाव सामिल झाले आहे.
Web Title: Popat Lal's 'Heroine' caught in a relationship with Maratha actor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.