'गेम ऑफ थ्रोन्स' ह्या वेबमालिकेचे जगभरात असंख्य चाहते आहेत. यात अनेक बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतले कलाकारही सामील आहेत. गेले अनेक दिवस हे चाहते शेवटच्या सीझनची वाट पाहत होते. आता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून ती पाहतानाचे फोटो आणि व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडिवरून शेअरही केले आहेत.

अभिनेत्री व नृत्यांगना पुर्वी भावेही 'गेम ऑफ थ्रोन्स'ची चाहती आहे. तिने मालिकेच्या शेवटच्या सीझनचे स्वागत थोडे आगळ्या पद्धतीने केले आहे. पुर्वीने भरतनाट्यम नृत्याद्वारे या मालिकेला मानवंदना दिली आहे.

याबद्दल पुर्वी भावे सांगते, 'मी 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेची खूप मोठी चाहती आहे. 'ग्रेम ऑफ थ्रोन्स'चे टायटल थीम ट्रॅक कुठेही ऐकले की लगेच माझे कान टवकारले जातात.  या थीम साँगवर मी मनातल्या मनात मालिका पाहताना खूपदा कोरीयोग्राफीही केली होती आणि शेवटच्या सीझनची घोषणा झाल्यावर गेले काही दिवस ब्रेक ऑफ रिएलिटी गाणे माझ्या मनात रूंजी घालत होती.'


ती पूढे सांगते, 'मी गेले काही दिवस कन्टेम्पररी भरतनाट्यमची एक सीरीज युट्यूबवर घेऊन येण्याचे प्लॅन करत होते. मग मनात आले की, ‘ब्रेक ऑफ रिएलिटी’ या गेम ऑफ थ्रोन्सच्या थीम साँगचे व्हर्जन पहिले कव्हर करावे. मग ही कल्पना सत्यात उतरवली.'


पुर्वी म्हणते, 'शास्त्रीय नृत्य आजच्या तरूणाईला आपलेसे वाटले पाहिजे, हा विचार ही कन्टम्पररी क्लासिक डान्स मालिका घेऊन येण्यामागे मी केला आहे. त्यातच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ला निवडण्यामागे अजून एक कारण आहे. भरतनाट्यममध्ये युद्ध, पक्षी, प्राणी यावर खूप सुंदर मुद्रा आहेत. या नृत्यशैलीतून ड्रॅगन, व्हाइट वॉकर्स यासारख्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मांडल्या जाऊ शकतात. ' 


Web Title: Poorvi Bhave first cover song on Game of Thrones theme Song
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.