Pooja Sawant's jeans top class class talk on the look! | पूजा सावंतचा जीन्स टॉपमधला क्लासी लूकवर होतेय चर्चा!

सई ताम्हणकर असो किंवा मग  अमृता खानविलकर किंवा मग पूजा सावंत या अभिनेत्री जीन्स टॉपमध्येही तितक्याच स्टाइलिश आणि अट्रॅक्टीव्ह दिसतात. जितक्या त्या एका वनपीस ड्रेसमध्ये ग्लॅमसर दिसतात तितका त्यांचा जीन्स आणि टॉपमध्ये घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळतो. सोबर स्टाइल लूकमध्येही या अभिनेत्री ''स्टाइल में रेहने का' म्हणत चाहत्यांच्या नजरा आकर्षित करण्यास भाग पाडतात.नुकताच पूजा सावंतने तिचा कुल अंदाजातला एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोत ती खूप एक्साटेड आणि आनंदित असल्याचे पाहायला मिळतंय.या फोटोत पूजाचा अगदी डिसेंट लूक पाहायला मिळतोय. सिंपल एंड सोबर असा फ्लोरल टॉप निळ्या रंगाची जीन्स तिने परिधान केली होती.  डोळ्यावर गॉगल,एक हँडबॅग  आणि पायात स्निकर घालत ती आणखी सुंदर दिसत होती. अतिशय साध्या पण तितकाच कंम्फर्ट असणा-या गेटअपमध्ये पूजाच्या या फोटोला सोशल मीडियावर खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत.पूजाही इतर अभिनेत्रींप्रमाणे सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिचे वेगवेगळे अंजादातले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्येतही खूप वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. इतकेच नाहीतर इन्स्टाग्रामवर प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंतने एंट्री करताच खूप कमी कालावधीत पाचशे हजारांहून अधिक फॉलोवर्स झाले होते.आणखी फ्लॉलोवर्स वाढू दे अशा अनेक शुभेच्छा तिला तिच्या चाहत्यांनी सोशलमिडीयावर दिल्या होत्या.
एरव्ही सिनेमात कधी देसी लूकमध्ये तर कधी वेस्टर्न लूकमध्ये दिसणारी पूजाचा हा क्लासी लूक पाहून तिचे चाहतेही तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या स्टायलिश लूकवरही फिदा होताना दिसतायेत.त्यामुळे पूजाचा हा फोटो चाहत्यांच्या नजरा आकर्षित करण्यास भाग पाडत आहे.इतकेच नव्हे तर लपाछपी सिनेमात पूजाने मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी तिचा गॉर्जिअस लूक सा-यांचा चर्चेचा विषय ठरला होता.लंडन येथे होत असलेल्या लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये पूजा सावंतची उपस्थितीने सां-याच्याच नजरा आकर्षित केल्या होत्या. काळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला पूजाचा  हा बोल्ड अंदाज पाहून ती स्टायलिश पर्सनालिटी म्हणूनही खूप सा-यां कॉम्प्लिमेंट तिला त्यावेळी मिळाल्या होत्या. तेव्हा पासून फक्त पूजाच्या सिनेरसिक सिनेमा अभिनयाचेच नाहीतर तिच्या घायाळ करणा-या सौदर्यांचेही कौतुक करताना दिसतात.

Also Read:म्हणून पूजा सावंतवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव
Web Title: Pooja Sawant's jeans top class class talk on the look!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.