Pooja Purandare and Vijay Indalkar did the stir | ​पूजा पुरंदरे आणि विजय अंदाळकर यांनी केला साखरपुडा

गेल्या काही महिन्यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. अस्मिता फेम मयुरी वाघने नुकतेच लग्न केले. तिने अस्मिता या मालिकेतील तिचा सहकलाकार पियुष रानडेसोबत विवाह केला. या दोघांच्या लग्नाच्या काही महिन्याअगोदर मराठीतीत दोन आघाडीच्या अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्या होत्या. श्रुती मराठेने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न करून तिच्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला तर मृण्मयी देशपांडेनेदेखील काही महिन्यांपूर्वी स्वप्निल रावसोबत लग्न केले आणि आता या कलाकारांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. 
कलर्स मराठी वाहिनीवरील किती सांगायचंय मला या मालिकेत झळकलेल्या पूजा पुरंदने नुकताच साखरपुडा केला. तिचा होणारा नवरादेखील तिच्याच क्षेत्रातील आहे. तिने अभिनेता विजय अंदाळकरसोबत साखरपुडा केला. विजय व्यवसायाने वकील असला तरी त्याने ढोल ताशे, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, 702 दिक्षित यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सगळ्याच चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. या दोघांनी नुकताच त्यांच्या जवळच्या नातलगांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत साखरपुडा केला. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे अनेक मित्रमंडळीदेखील उपस्थितीत होते.

pooja purandare Vijay Andalkar  

पूजा आणि विजय हे गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात असून त्यांनी नुकताच लग्न करण्याचा निर्णय घेतला. पूजा आणि विजयनेच फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरून ही गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली. त्या दोघींनी त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल नेटवर्किंगला पोस्ट केले आहेत. पूजा आणि विजयने लग्नाची तारीख अद्याप सांगितली नसली तरी ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Pooja Purandare and Vijay Indalkar did the stir
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.