Photos shared by Amrita Khanvilkar, comments given by fans! | अमृता खानविलकरने शेअर केला फोटो,तर चाहत्यांनी दिल्या अशा कमेंट्स!

अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने आणि नृत्याने अक्षरक्षः वेड लावले. मराठी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये'चे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे. सध्या अमृता डान्स इंडिया डान्स हा रिअॅलिटी डान्स शो होस्ट करत आहे. मराठी, हिंदीमधील विविध शोमध्ये बिझी असणारी अमृता सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. कायमच ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच तिने शेअर केलेला फोटो सध्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत ती सुंदर दिसत असून तिचा हटके लूक फॅन्सना भावतो आहे. या फोटोत अमृताने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. अमृता स्टायलिश हे सा-यांना माहिती आहे. तिच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. त्यासाठी तिला विविध पुरस्कारही मिळालेत. तिच्या नव्या हिरव्या ड्रेसमधील फोटोच्या निमित्ताने फॅन्सना तिची हटके स्टाईल दिसते. हिरव्या ड्रेसमध्ये ती जणू काही फुलपाखरु असल्याप्रमाणे वाटत आहे. तिची ही अदा कुणालाही घायाळ करणारी अशीच आहे. 

Also Read: अमृता खानविलकरला पतीकडून सरप्राईज,वाढदिवसाचं असं केलं जंगी सेलिब्रेशन

नुकतचे अमृताच्या घरीही तिचा ३२वा वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी तिचा पती आणि टी.व्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रा आणि अमृताच्या आईने तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टी ठेवली होती. बर्थ डे सेलिब्रेशन दरम्यान मराठी अभिनेत्री सोनाली खरेसुद्धा आपल्या खास मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी यावेळी आवर्जून उपस्थित होती. अमृताच्या या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो हिमांशूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वाढदिवसानिमित्त अमृताला पती हिमांशूकडून खास गिफ्टसुद्धा मिळालं आहे. हेच गिफ्ट हातात घेतलेला फोटोही यांत पाहायला मिळतो आहे. या फोटोंमध्ये अमृता आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येत आहे. अमृताच्या या वाढदिवस सेलिब्रेशनच्या फोटोंवर रसिकांकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 
Web Title: Photos shared by Amrita Khanvilkar, comments given by fans!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.