वैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:59 PM2018-11-14T14:59:39+5:302018-11-14T15:01:10+5:30

वैभव तत्ववादी 'ग्रे' मराठी चित्रपट व कंगना रानौत अभिनीत 'मणिकर्णिका' या हिंदी चित्रपटात दिसणार आहे.

Photographs on the set by the Vaibhav Tatvavadi shared on social media | वैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो

वैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो

googlenewsNext


वैभव तत्ववादीने सोशल मीडियावर शेअर केला सेटवरील फोटो

अभिनेता वैभव तत्ववादीने मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकतेच तो अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोबत 'व्हॉट्सअप लग्न' चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता तो 'ग्रे' मराठी चित्रपट व कंगना रानौत अभिनीत 'मणिकर्णिका' या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत वैभवसोबत रणविजय सिंग व रायमा सेन दिसत आहेत.

अभिनेता वैभव तत्तवादीने एका सेटवरील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत अभिनेत्री रायमा सेन व रणविजय सिंग दिसतो आहे. वैभवने हा सेट महाबळेश्वरमध्ये असल्याचे सांगितले आहे. 

वैभव तत्ववादीने तिघांचा सेटवरील फोटो शेअर केला आहे. मात्र त्याने हा फोटो कोणत्या सिनेमातील किंवा वेबसीरिजच्या सेटवरील आहे हे समजू शकलेले नाही. मात्र रणविजय पोलीस वेशात दिसतो आहे. परंतु त्याच्या कथानकाबद्दल व प्रोजेक्टबद्द्ल काहीही समजू शकलेले नाही. 
 

अभिनेता वैभव तत्ववादीने 'फक्त लढा म्हणा' या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 'सुराज्य', 'कॉफी आणि बरंच काही', 'शॉर्टकट', 'मि. अॅण्ड मिसेस सदाचारी' यांसारख्या मराठी सिनेमात आणि 'हंटर', 'बाजीराव मस्तानी' व 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या हिंदी चित्रपटात तो झळकला आहे. त्याने अल्पावधीतच मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. 


 

Web Title: Photographs on the set by the Vaibhav Tatvavadi shared on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.