Photo of Sai Tamhankar Viral on social media | ​सई ताम्हणकरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आतापर्यंत अभिनेत्यांच्या सिक्स पॅक अँब्जची चर्चा होताना आपण अनेकदा पहिले आहे. बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान, हृतिक रोशन, जॉन अब्राहम यांच्या सिक्स पॅक अॅब्सवर तर त्यांचे फॅन्स फिदा आहेत. हा सिक्स पॅक्स अॅब्जचा ट्रेंड सध्या मराठीत देखील पाहायला मिळत आहे. मराठीत उमेश कामत, आदिनाथ कोठारे, भुषण प्रधान या अभिनेत्यांच्या फिटनेसचे चांगलेच कौतुक केले जात आहे. सिक्स पॅक अॅब्स म्हटले की हिरो असेच काहीसे गणित आपल्या डोक्यात असते. परंतु २०१८ च्या सुरुवातीला अभिनेत्री सई ताम्हणकरने हे गणित अगदी खोडून काढलंय. मुलींचा फिटनेस काय असतो हे सांगणारा एक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या तिच्या फोटोमध्ये आपल्याला तिचे अॅब्स अगदी स्पष्ट दिसत आहेत. 
सई नेहमीच तिच्या फिटनेसबद्दल प्रचंड जागरूक असते. तिचे प्रोटीन डाएट देखील २०१७ मध्ये चर्चेचा विषय बनले होते. परंतु ही अशी परफेक्ट साइझ ठेवण्याचे किंवा अशाप्रकारे आगळे वेगळे फोटोशूट करण्याचे नेमके काय कारण असू शकते याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सईने या फोटोसोबत एक छानशी कॅप्शन देखील लिहिली आहे. ही कॅप्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या कॅप्शनमध्ये सईने लिहिले आहे की, प्रत्येक वर्षांत तुमचे नवीन व्हर्जन असावे असे तुमचे आयुष्य तुमच्याकडे मागणी करत असतं. त्यामुळेच हे एक वेगळे रूप...
सई ताम्हणकरचे हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकरने केले आहे. सईचे हे नवीन वर्ष अपेक्षेपेक्षा खूप जास्त ग्लॅमरस आणि जोरदार असणार आहे हे तिने तिच्या फोटोशूटच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगितले आहे. या फोटोशूटमधील तिच्या कपड्यांची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सईच्या फोटो शूटचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून तिच्या फॅन्सने या फोटोंना भरभरून प्रतिसाद दिला आहे. सईचा हा बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाज तिच्या फॅन्सना चांगलाच भावत आहे. 

Also Read : फेमिनामध्ये सई ताम्हणकरचा जलवा,व्हाईट गाऊनमध्ये दिसली ग्लॅमरस
Web Title: Photo of Sai Tamhankar Viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.