Pallavi Subhash celebrated birthday, shared photo | पल्लवी सुभाषने असा साजरा केला वाढदिवस, शेअर केला PHOTO

सेलिब्रिटींचा बर्थ डे सेलिब्रेशन थो़डं खास असतं... थोडं हटके असतं.अभिनेत्री पल्लवी सुभाषने नुकताच तिचा 34वा वाढदिवस साजरा केला.Birthday Special असे कॅप्शन तिने शेअर केलेल्या फोटोला दिले आहे. केक हातात घेत आपला एक बर्थ डे स्पेशल फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.तिचा हा फोटो पाहताच सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या खूप सा-या शुभेच्छाही दिल्याचे पाहायला मिळत आहे.अभिनेत्री पल्लवी सुभाषने अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये तसेच जाहिरातींमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे.छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे.प्रसिद्ध मालिका 'चक्रवर्ती अशोक सम्राटम'ध्ये पल्लवीने भूमिका साकारलेल्या भूमिकेचे सर्वच स्थरावरून विशेष कौतुक झाले होते.मालिके आधी तिने 'गोद भराई','बसेरा','आठवा वचन','तुम्हारी दिशा' सारख्या मालिकांमधून पल्लवीने हे मराठी नावही घराघरातही गाजले आहे.त्याचबरोबर पल्लवीने साऊथ चित्रपटसृष्टीत देखील याआधी काम केले होते.पल्लवीने हिंदी मराठीसहसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही काम केले आहे. तेलुगू भाषेतील एका सिनेमातही ती झळकली आहे. आयुषमान खुरानाचा 'विकी डोनर' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. याच चित्रपटाचा रिमेक तेलुगू भाषेत करण्यात आला आहे. या रिमेकमध्ये पल्लवीने प्रमुख भूमिका साकारली आहे. 

Web Title: Pallavi Subhash celebrated birthday, shared photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.