One-way ticket to the Treasure Display | वन वे तिकीटचा ट्रीझर प्रदर्शित

अमोल शेटगे लिखित आणि दिग्दर्शित 'वन वे तिकीट' या चित्रपटाचा नुकताच ट्रीझर प्रदर्शित करण्यात आला. क्रुझवर चित्रित करण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट वन वे तिकीट याचा हा  दुसरा टिझर आहे. इटली, स्पेन आणि फ्रान्स या ठिकाणच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात रोमॅन्स, ससपेन्स, थ्रिलर यांचं मिश्रण अनुभवयाला मिळणार आहे. 'वन वे तिकीट' या चित्रपटात पाच व्यक्ती आणि त्यांचा इंटरेस्टिंग पण थराराक असा क्रुझवरचा प्रवास दाखवण्यात आला आहे. क्रुझवरच्या पाच व्यक्ती म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर, नेहा महाजन, अभिनेता सचित पाटील, गश्मीर महाजनी आणि शशांक केतकर. क्रुझवरची रोमॅन्स, ससपेन्स आणि थ्रिलर वन वे तिकीट  सफारी लवकरच प्रेक्षकांना अनुभवयाला मिळेल.


Web Title: One-way ticket to the Treasure Display
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.