OMG: This hot hot photo of actress Prajakta Mali discusses social media? | OMG: अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या याच हॉट फोटोची होतेय सोशल मीडियावर चर्चा ?

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयामुळे लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.आपला अभिनय आणि खट्याळ भूमिका यामुळे प्राजक्ता रसिकांची लाडकी बनली आहे. मात्र प्राजक्ताचा सध्या कधीही न पाहिलेला लूक चर्चेचा विषय ठरला आहे प्राजक्ता हा अंदाज तुम्हालाही थक्क करेल. ही नक्की प्राजक्ताच आहे का असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. मोकळे सोडलेले केस, हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज कुणालाही घायाळ करेल. काळ्या रंगाच्या आकर्षक स्लीव्हलेस टॉपमुळे प्राजक्ताची अदा मादक आणि तितकीच कातिलाना आहे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्राजक्ताला आजवर रसिकांनी विविध मालिकांमधून वेगवेगळ्या रुपात पाहिलं आहे. कधी ड्रेसवर, तर कधी साडी परिधान करुन प्राजक्ताने रसिकाची मनं जिंकली आहेत. मात्र प्राजक्ता इतका हॉट आणि सेक्सी अंदाज रसिकांनी आजवर कधीही पाहिला नव्हता. सोशल मीडियावर सध्या प्राजक्ताचा हा सेक्सी लूक चर्चेचा विषय ठरला आहे. प्राजक्ता माळी साध्या आणि पारंपरिक अंदाजात जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाज रसिकांना पसंत पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्राजक्ताचा हा फोटो नेमका कशासाठी याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहेत. तिचा हा सेक्सी लूक तिच्या आगामी सिनेमासाठी तर नाही ना अशीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एखाद्या फोटोशूटसाठी प्राजक्ताने हे फोटो काढल्याचेही बोललं जात आहे. काहीही असले तरी प्राजक्ता माळीचा या दिलखेचक अदा रसिक आणि तिच्या फॅन्सना आकर्षित करत आहेत.   
Web Title: OMG: This hot hot photo of actress Prajakta Mali discusses social media?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.