Ojas Joshi's new project, student strength to fight! | ओजस जोशीचा नवा प्रोजेक्ट,विद्यार्थ्याना देणार लढण्याचं बळ!

सध्या हिंदी व पाश्चिमात्य संगीताचा मारा मोठ्या प्रमाणावर होतोय. अशा परिस्थितीत मराठी संगीत आजच्या युवा पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.अनेक गुणी कलाकार त्यासाठी प्रयत्नशील आहेत.त्यातलेच एक नाव म्हणजे ओजस जोशी.या युवा संगीतकाराने‘ओजस जोश’या माध्यमातून मराठी गीतांचा नजराणा श्रोत्यांसाठी आणला आहे.ओजस जोशचं ‘मित्रांनो’ हे तिसरं गीत नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकशित करण्यात आले. ''बघितलं जे स्वप्न आहे, कठीण त्याची वाट आहे.थकायचं थांबायचं आता नाही, ध्येय तुला गाठायचे आहे.''असे या अल्बमचे बोल आहेत.
 
रुपेश पवार यांनी लिहिलेले हे गीत ओजस जोशीने गायले आहे.म्युझिक मिक्सिंग आणि मास्टरिंग अमेय गुंडाळे तर छायांकन अभिजीत सिंग यांचे आहे.आजच्या युगात विदयार्थ्यांवर बराच ताण असतो.या ताण तणावावर मात करून आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाण्याचा संदेश या गीतातून देण्यात आला आहे.ओजस जोशी याची ‘काही तरी करून दाखवायचं आहे’ आणि ‘रुसणं’ ही दोन गीते याआधी प्रकाशित झाली आहेत.
आपल्या या उपक्रमाबद्दल बोलताना ओजस जोशीने सांगितले की,मला मराठी संगीत प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे.त्यासाठी गुणी गायक,वादकांच्या आणि क्राउड फंडिंगच्या मदतीने मी हा उपक्रम सुरु केला आहे. इलेक्ट्रॅानिक म्युझिक आणि मराठी कविता यांचा मेळ साधत आम्ही ही तीन गीते रसिकांसाठी आणली आहेत.माझ्या आधीच्या दोन गीतांना मिळालेला प्रतिसाद खूपच चांगला आहे.‘मित्रांनो’ हे तिसरं गीत ही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास ओजस जोशीने व्यक्त केला.भविष्यात आणखी चांगली गीते प्रकाशित करण्याचा मानस ओजस जोशीने यावेळी बोलून दाखवला.
Web Title: Ojas Joshi's new project, student strength to fight!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.