'Nude' will be seen in the title of the movie, 'This' festival will be seen in the opening | 'न्यूड' सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘या’ महोत्सवाच्या ओपनिंगला झळकणार

दिग्दर्शक रवी जाधव यांचा 'न्यूड' हा सिनेमा रिलीजआधीच चर्चेत आला आहे.गोवा इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.यावर दिग्दर्शक रवी जाधव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता न्यूड या सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी बातमी आली आहे. न्यूड या सिनेमाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग सिनेमाचा बहुमान मिळाला आहे.दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी रसिकांसह शेअर केली आहे.न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग सिनेमाचा मान मिळवणारा 'न्यूड' हा पहिला मराठी सिनेमा असणार आहे. ७ ते १२ मे या कालावधीत इंडो अमेरिकन आर्ट काऊन्सिलचा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे.रवी जाधव यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.मराठी कलाकार आणि सेलिब्रिटींकडून न्यूड सिनेमाच्या टीमचे कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.गेल्या वर्षी गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून हा चित्रपट ऐनवेळी वगळण्यात आला होता. महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या अंतिम यादीतून ‘न्यूड’ वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता. विशेष म्हणजे परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर रवी जाधव यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या निर्णयावर टीका केली होती. मात्र न्यूड या सिनेमाने रिलीजआधीच सा-यांची मनं जिंकण्यास सुरुवात केली आहे.या सिनेमाला ए प्रमाणपत्र देण्यात आलं असून अभिनेत्री विद्या बालनसह ज्युरीने सिनेमाच्या कथेचे स्टँडिंग ओव्हेशन देत कौतुक केले होतं. हा सिनेमा २७ एप्रिलला रसिकांच्या भेटीला येत आहे. यांत राजश्री देशपांडेची मुख्य भूमिका आहे.

(Also Read:अंमली पदार्थांविरोधात रवी जाधवचा एल्गार)


मराठी चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर रवी जाधव हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळले.त्यांनी गेल्या वर्षी बँजो या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांच्या या चित्रपटाचे देखील समीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुक केले होते.त्याचप्रमाणे त्यांच्या नव्या चित्रपटाचे नाव आगळे वेगळे असून या चित्रपटावर ते लवकरच काम करायला सुरुवात करणार आहेत. रंपाट असे त्यांच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. 
Web Title: 'Nude' will be seen in the title of the movie, 'This' festival will be seen in the opening
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.