Now Madhuri Dixit is the producer of the film, the main role of the artist to make the artist | ​आता माधुरी दीक्षित करणार चित्रपटाची निर्मिती, हे कलाकार साकारणार मुख्य भूमिका

माधुरी दीक्षितला बॉलिवूडची धकधक गर्ल म्हटले जाते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आता ती प्रेक्षकांना एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या या मराठी चित्रपटाचे नाव बकेट लिस्ट असून या चित्रपटात सुमीत राघवन तिच्या नायकाची भूमिका साकारत आहे. माधुरीच्या बकेट लिस्ट या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर तिने तिच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली घोषणा केली आहे. माधुरी आता प्रेक्षकांना निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून हा एक कॉमेडी चित्रपट आहे. स्वातंत्र्य हे एक असे गिफ्ट आहे जे केवळ तुम्ही स्वतःला देऊ शकता या विषयावर हा चित्रपट असणार असून मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे नाव १५ ऑगस्ट असून या चित्रपटात राहुल पेठे आणि मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राहुलने आजवर व्हेंटिलेटर, वक्रतुंड महाकाय, मुंबई मेरी जान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर मृण्मयीला अग्निहोत्र, कुंकू यांसारख्या मालिकांमुळे प्रसिद्धी मिळाली. तिने नटसम्राट आणि कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 
१५ ऑगस्ट या चित्रपटाची कथा विनायक जोशी यांनी लिहिली असून त्यांनी याआधी मुंबई मेरी जान, टेंडुलकर ऑऊट यांसारख्या चित्रपटांचे लेखन केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ननील जयकर करणार असून टेंडुलकर ऑऊट या त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटाच्या निर्मितीविषयी माधुरी सांगते, मी गेल्या ३० वर्षांपासून कॅमेऱ्याच्या समोर काम करत आहे. आता निर्मात्याची भूमिका पार पाडण्यास मी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाची कथा खूप चांगली असून स्वप्ननील या चित्रपटाचे दिग्दर्शन खूप चांगल्या प्रकारे करेल असा मला विश्वास आहे. या चित्रपटाची टीम देखील खूपच चांगली आहे. राहुल आणि मृण्मयी हे दोघेही खूप चांगले कलाकार आहेत. कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मी एक निर्माती म्हणून देखील प्रेक्षकांच्या मनात घर करू शकेन अशी मला खात्री आहे. 

Also Read : ​माधुरी दीक्षितने तेजाब या चित्रपटाच्या वेळेचा शेअर केला अनुभव
Web Title: Now Madhuri Dixit is the producer of the film, the main role of the artist to make the artist
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.