Now it will be the birthday of Swapnil Joshi and his son's birthday in the same day | ​आता स्वप्निल जोशीच्या या लाडक्या मित्राचा आणि त्याच्या मुलाचा वाढदिवस असणार एकाच दिवशी

स्वप्निल जोशी आणि अली असगर हे गेली अनेक वर्षं एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. अली आणि स्वप्निल यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दिल विल प्यार व्यार या मालिकेत काम केले होते. त्याच्यानंतर देखील ते घर की बात है या मालिकेत एकत्र झळकले होते. कॉमेडी सर्कसमधील अली आणि स्वप्निलच्या जोडीचे तर चांगलेच कौतुक झाले होते. त्या दोघांनी कॉमेडी सर्कसच्या अनेक सिझनचे विजेतेपद देखील पटकावले आहे. 
स्वप्निलच्या अनेक मराठी चित्रपटांच्या प्रिमियरला अली आवर्जून उपस्थित असतो. अली आणि स्वप्निलच्या घट्ट मैत्रीविषयी सगळ्यांनाच चांगलेच माहीत आहे. स्वप्निलच्या या लाडक्या मित्राच्याच वाढदिवसाच्या दिवशी स्वप्निलला मुलगा झाला. आपल्या लाडक्या मित्राच्या मुलाचा म्हणजेच आपल्या पुतण्याचा आणि आपला वाढदिवस आता एकत्र असणार हे कळल्यावर अलीला प्रचंड आनंद झाला आहे. अलीने त्याचा हा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. स्वप्निलने अलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक ट्वीट केले होते. त्याने त्यात म्हटले होते की, भाई, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुझा आजचा वाढदिवस मला आणि तुला आयुष्यभर लक्षात राहाणार. स्वप्निलच्या या ट्वीटला रिप्लाय देताना अलीने म्हटले आहे की, मुलगा झाल्याबद्दल तुझे अभिनंदन. आता आपल्या कुटुंबात एकच केक मी आणि माझा पुतणा मिळून कापणार...

ali asgar swapnil joshi

स्वप्निल जोशीला सात तारखेला मुलगा झाला. त्यानेच ही गोड बातमी ‘सीएनएक्स लोकमत’ला दिली होती. सीएनएक्सशी बोलताना त्याने सांगितले होते की, ‘होय, इट्स बेबी बॉय... लिनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, तिची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे.   
स्वप्नीलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. स्वप्नील आणि लिना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बंधनात अडकले होते. लिना ही व्यवसायाने डेन्टिस्ट असून ती मूळची औरंगाबादची आहे. या दाम्पत्याला मायरा नावाची पहिली मुलगी असून ती आता दीड वर्षांची झाली आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे संपूर्ण जोशी कुटुंब सध्या प्रचंड आनंदी आहे.

Also Read : ​स्वप्निल जोशी पुन्हा झाला डॅडी, जोशी कुुटुंबात झाले गोंडस बाळाचे आगमन

Web Title: Now it will be the birthday of Swapnil Joshi and his son's birthday in the same day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.