Not Only Misses Route Fame Aditi Deshpande To Watch The Guardian Piya Ki In This Series | ​नॉट ओन्ली मिसेस राऊत फेम आदिती देशपांडे झळकणार पहरेदार पिया की या मालिकेत

आदिती देशपांडेने नॉट ओन्ली मिसेस राऊत, पक पक पकाक यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या नॉट ओन्ली मिसेस राऊत या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. या चित्रपटात तिने साकारलेली विद्या राऊत ही भूमिका खूप गाजली होती. तिने चित्रपटात काम करण्यासोबतच चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. तिच्या दर्जेदार भूमिकांसाठी तिचे नेहमीच कौतुक केले जाते. मराठी चित्रपटात मिळालेल्या यशानंतर आदितीने एका नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
आदिती देशपांडे आता एका हिंदी मालिकेत झळकणार आहे. पहरेदार पिया की या मालिकेच्या वेगळ्या कथानकामुळे ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत आदिती प्रेक्षकांना एका मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी ती सध्या चांगलीच तयारी करत आहे. या मालिकेत ती छोटी मासा ही भूमिका साकारणार आहे. आदितीची ही पहिलीच हिंदी मालिका असल्यामुळे ती या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे आणि विशेष म्हणजे या मालिकेत तिची भूमिका ही काहीशी नकारात्मक असणार आहे. तसेच या मालिकेतील तिचा लूकदेखील खूप वेगळा असणार आहे.
पहरेदार पिया की या मालिकेची कथा एका राजेशाही कुटुंबाभोवती फिरत असल्याने या मालिकेतील तिचा लूकदेखील एखाद्या राणीसारखा असणार आहे. या मालिकेत ती भरजरी वस्त्र घालणार असून अनेक दागिने घालणार आहे.
पहरेदार पिया की या मालिकेत प्रेक्षकांना नऊ वर्षांचा मुलगा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची कथा पाहायला मिळणार आहे. दिया आपल्या स्वप्नांचे बलिदान देऊन रतनच्या रक्षणार्थ त्याच्याशी विवाह करणार आहे. 

Also Read : वादळामुळे पहरेदार पिया कीचे चित्रीकरण झाले विस्कळीत
Web Title: Not Only Misses Route Fame Aditi Deshpande To Watch The Guardian Piya Ki In This Series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.