Nikhil Ranade's forthcoming 'Unfair' music singles were shot abroad | निखिल रानडेच्या आगामी 'बेफिकर' म्युझिक सिंगलचे परदेशात झाले शूटिंग

सिनेमासाठी सगळ्यात जास्त पसंती मिळणारं परदेशी लोकेशन्स म्हणजे अमेरिका.. अमेरिकन शहर, द गोल्डन प्लेट, टाइम्स स्केअर, बेवेरली हिल्स, ग्रँड सेंट्रल स्टेशन अशा एकाहून एक सरस लोकेशन्सचा नजारा सिनेमात पाहायला मिळाला.मात्र आता मराठीतही विवध सिनेातून फॉरेन लोकेशनचे दर्शन घडले.मात्र आता म्युझिक सिंगलचे फॉरेन लोकेशनवर शूटिंग करण्यात आले आहे.बॉलिवुडप्रमाणेच सध्या मराठीमध्येदेखील सिंगल साँगची क्रेझ निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक सिंगल साँग प्रेक्षकांच्या भेटिला येत असल्याचे दिसत आहे. आता लवकरच आणखी एक सिंगल साँग खास प्रेक्षकांसाठी सज्ज झाले आहे.आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने आजच्या तरुणाईला भुरळ पाडणारा निखिल रानडे आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे. परदेशात पहिल्यांदाच चित्रित करण्यात आलेल्या मराठी 'इशारा तुझा' या म्युझिक सिंगलची निर्मिती करून मराठी सिनेसृष्टीत झालेला बदल दाखवून दिला.फोटोग्राफी व्यवसायात वेडिंग फोटोग्राफी, कँडिड फोटोग्राफी तसेच सिनेमॅटिक वेडिंग व्हिडीओ तसेच डेस्टिनेशन वेडिंग यात हातखंडा असलेल्या निखिलने आपली संगीताचीही आवड जोपासली.निर्माता,दिग्दर्शक आणि गायक म्हणून आपली एक ओळख त्याने निर्माण केली. 'बेफिकर' हा त्यांचा नवीन म्युझिक सिंगल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.निखिल रानडेने आपल्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत 'झोका तुझा','इशारा तुझा'या मराठी गाण्यांचे तर 'जोगी' या हिंदी गाण्याचे दिग्दर्शन तसेच निर्मिती केली. 'यार' या निहार शेंबेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या गाणं निखिलने गायलं असून त्यात अभिनयसुद्धा केला आहे.'इशारा तुझा' या गाण्याच्या दिग्दर्शनासोबतचं गायनाची,अभिनयाची तसेच निर्मितीचीही धुरा सांभाळली होती.निखिलनेआपल्या प्रत्येक गाण्यांमधून नवीन कलाकारांना संधी दिली. नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळावं या उद्देशाने कायम प्रयत्नशील असलेल्या निखिलचे येत्या वर्षी ३ वेगवेगळ्या जॉनरचे म्युझिक सिंगल आपल्या भेटीला येणार आहे.'बेफिकर' हा म्युझिक सिंगल जानेवारीत प्रदर्शित होणार असून निखिलनेच हे गाणं गायलं आहे.पेपी ट्रॅक असलेलं हे गाणं तरुणाईला आपल्या तालावर थिरकायला भाग पाडणार हे मात्र नक्की. अतुल जोशी यांनी लिहिलेल्या शब्दांना निहार शेंबेकर यांनी संगीतबद्ध केले आहे.राजीव रानडे यांनी या सिंगलचे छायाचित्रण केले असून स्कॉटलंड येथील निसर्गरम्य स्थळांचे दर्शन आपल्याला या गाण्यात दिसून येणार आहे.'बेफिकर' या गाण्यानंतर निखिल यांचे 'सांग ना' 'मन गुंतते' हे आगामी म्युझिक सिंगल्स आपल्या भेटीला येणार आहेत.   
Web Title: Nikhil Ranade's forthcoming 'Unfair' music singles were shot abroad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.