A new tweet with Mukta Barve and Swapnil Joshi | मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीच्या नात्यात एक नवीन ट्वीस्ट

  नुकताच ११ मे ला प्रदर्शित झालेल्या निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदर निर्मित 'रणांगण' चित्रपटाची हवा सध्या सर्वत्र पसरलेली दिसून येते आहे. सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांच्या नात्यातील हे रणांगण प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरत असलं तरीही या चित्रपटातील ट्वीस्ट म्हणजे मुक्ता बर्वेची आश्चर्यकारक एंट्री. 

        आजवर अनेक चित्रपटांमधून 'द परफेक्ट रोमँटिक कपल' म्हणून ओळखले जाणारे स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या नात्याला 'रणांगण' चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे. 'रणांगण' चित्रपटात मुक्ता, स्वप्नीलची प्रेयसी नाही तर आईच्या भूमिकेत व सचिन पिळगांवकर यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत वावरताना दिसून येते आहे. कलियुगात बदलत चाललेल्या नात्यांचं चित्रण करताना 'रणांगण' चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक राकेश सारंग यांनी चित्रपटात आणलेला हा ट्विस्ट प्रेक्षकांना अवाक करून सोडतो यात काही शंकाच नाही?    
 
        मराठी चित्रपट सृष्टीतील काजोल आणि शारुख खान म्हणजेच मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी या लव्हबर्ड्सना 'रणांगण' चित्रपटाच्या निमित्ताने आई आणि मुलगा ह्या नवीन भूमिकेत तर सचिन पिळगांवकर आणि मुक्ता बर्वे ह्यांना प्रेमीयुगुलांच्या भूमिकेत बघायला खरी मजा येणार आहे. सचिनजी, स्वप्नील आणि मुक्ता यांच्या नात्याला युद्धाचा स्वर का लागला? या युध्दामागची नक्की कारणं काय? कोणत्या परिस्थितीने यांना रणांगणात एकमेकांविरोधात उभं केलं आहे? या रणांगणात विजयी कोण ठरणार… या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजच्या युगात आजची कलाकृती मांडणाऱ्या 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट तुम्ही  लवकरच ११ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा कारण, आता युद्ध अटळ आहे!.
Web Title: A new tweet with Mukta Barve and Swapnil Joshi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.