Nepali Comedian Binod Rai Bantawa In 'Lose Control' | ​नेपाळी कॉमेडियन बिनोद राय बंटावा ‘लूज कंट्रोल’ चित्रपटात

‘लूज कंट्रोल’ सिनेमात एक नेपाळी अभिनेता एका मुख्य भूमिकेत दिसत आहे. हा कलाकार मुळचा नेपाळचा असून खास या चित्रपटात काम करण्यासाठी त्याला नेपाळहून बोलण्यात आले. हा कलाकार लूज कंट्रोल या चित्रपटाचा हिस्सा कसा बनला याचा एक मजेदार किस्सा आहे. बिनोद राय बंटावा असे या नेपाळी कलाकाराचे नाव असून हा नेपाळमधील प्रसिद्ध स्टॅन्डअप कॉमेडियन आहे. हा कलाकार आधी मुंबईला सिनेमात काम करण्यासाठी येण्यास तयारच नव्हता. तो मुंबईला यायला का तयार नव्हता हे ऐकल्यावर तुम्हीही पोट धरून हसाल. झाले असे की, बिनोदला असे वाटत होते की, मुंबईत गेल्यावर येथील लोक त्याची किडनी काढून विकतील. मुंबईकरांबद्दल ही एक वेगळीच भीती त्याच्या मनात होती. त्यामुळे दोनदा त्याचे तिकीट कॅन्सल देखील करावे लागले होते. शेवटी चित्रपटाच्या टीममधील मंडळींनी त्याची समजूत काढल्यावर तो चित्रपटात काम करायला तयार झाला. मुंबईत आल्यावर त्याचा हा गैरसमज दूर झाला आणि शूटिंगच्या वेळी तर त्याने चांगलीच धमाल मस्ती केली. कोणत्याही नेपाळी कलाकाराने मराठी सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
‘लूज कंट्रोल’ची कथा भलेही तीन मित्रांची असली तरी या सिनेमातून प्रेक्षकांना सिच्युएशनल कॉमेडीचा कंट्रोल सोडून आनंद घेता येत आहे. कारण यातील सर्वच लोकप्रिय कलाकारांनी एकापेक्षा एक, रंगीबेरंगी भूमिका साकारल्या आहेत.अजित साटम, रियाझ इनामदार, साकीब शेख, जिग्नेश पटेल, मिहीर भट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या तीन मित्रांची ही कथा असून रोजच्या जगण्यातील कथानक यातून मांडण्यात आले आहे. या धमाल सिनेमात भाऊ कदम, कुशल बद्रीके, मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशिकांत केरकर, शशांक शेंडे, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय  बंटावा, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर, अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 

Also Read : ​भाऊ कदम आणि कुशल बद्रीकेची फटकेबाजी
Web Title: Nepali Comedian Binod Rai Bantawa In 'Lose Control'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.