Need to 'BAN' these things than Padmavat - Renuka Shahani | Padmavat पेक्षा या गोष्टी 'बॅन'करण्याची गरज- रेणुका शहाणे

‘पद्मावत’ या चित्रपटावर लादलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही  करणी सेनेचे आंदोलन आणि बयानबाजी सुरु आहे. गुरूवारी ‘पद्मावत’ विरोधात देशभर हिंसक निदर्शनेही सुरू आहेत.एक चित्रपटावरून इतका वाद होत असल्याचे पाहुन खरंच या मुद्द्याल इतकं ताणून धरणं खरच गरजेचे आहे का ? असा प्रश्न आता सगळ्यांनाच भेडसावत आहे.त्यामुळे पद्मावत चित्रपटाला घेवून सर्वच स्थळावरून वेगवेगळ्या परिने पाठिंबाही देत असल्याचे पाहायला मिळतेय.कलाकारही पद्मावत चित्रपटाला पाठिंबा देताना दिसतायेत.अनेक वादानंतर काही दुरूस्त्यांसह सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या रिलीजला परवानगी दिली.त्याचबरोबर अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री रेणुका शहाणेने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या संपूर्ण देशभरात पद्मावत विरुद्ध करणी सेना अशी जंग छेडली गेली आहे.'पद्मावत' प्रदर्शित होऊ नये यासाठी करणी सेनेचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीतील लोकांचे प्रतिनीधीत्व करत रेणुका शहाणे यांनी पद्मावत नव्हे तर स्त्रीभ्रुण हत्या,महिलांची छेडछाड, बलात्कार या गोष्टींना बॅन करण्याची देशाला गरज असल्याचे सांगितले.त्यांनी एक पोस्टर हातात घेत फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. रेणुका यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून अनेक कमेंटसही मिळत असल्याचे पाहायला मिळत आहेत. देशात अनेक मुद्दे आहेत ज्यांच्यावर आपण आपले लक्ष केंद्रित करून सोडवण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिक्रीया त्यांना या पोस्टवर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.


cnxoldfiles/a>‘पद्मावत’ प्रदर्शनाच्या विरोधात येत्या २४ जानेवारीला राजपूत महिला चित्तोडमध्ये ‘जोहार’ करतील, असेही करणी सेनेने जाहिर केले आहे. ‘जोहार’साठी १८२६ महिला राजी झाल्या असल्याचे मकराना यांनी सांगितले. अलाऊद्दीन खिल्जीने युद्ध छेडले आणि या लढाईत चित्तोडचे अनेक सैनिक मारले गेले. युद्धात राजा रतनसिंह यांचाही मृत्यू झाला. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. राणी पद्मावतीने किल्ल्याच्या आत चितेत उडीत घेण्याचा निर्णय घेतला. स्त्रियांना बंदी बनवण्यास खिल्जीने किल्ल्यात प्रवेश करताच राणी पद्मावती यांच्यासह सुमारे १६ हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली. सतीच्या या प्रकारालाच राजस्थानमध्ये ‘जोहार’ म्हणतात.
Web Title: Need to 'BAN' these things than Padmavat - Renuka Shahani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.