Naseeruddin Shah, who was honored by Devbabali drama in music, said, | संगीत देवबाभळी नाटक पाहून भारावले नसिरुद्दीन शाह, या शब्दांत दिली कलाकारांना कौतुकाची थाप

एखाद्या बड्या कलाकारानं आपलं कौतुक करावं,आपल्या अभिनयाला दाद द्यावी अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते.यांत विशेष उल्लेख करावा लागेल तो रंगभूमीवरील कलाकारांचा. कारण सिनेमा आणि टीव्ही या माध्यमांमध्ये एखादा सीन चुकल्यास तो पुन्हा शूट करण्याची संधी असते. मात्र रंगभूमीवर कलाकार जे काही सादर करतो तेच रसिकांपर्यंत जात असते.त्यामुळे रंगभूमीवरील कलाकारांसाठी अशी बड्या कलाकाराकडून मिळणारी दाद आणि कौतुक हे विशेष असतं. असंच काहीसं झालं आहे रंगभूमीवर गाजत असलेल्या संगीत 'देवबाभळी' या नाटकातील कलाकारांबाबत.या कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक खुद्द अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी केलं आहे. या नाटकाचा प्रयोग पाहून झाल्यानंतर नसिरसाहेब या नाटकातील कलाकारांजवळ गेले.असं नाटक तुम्ही करत आहात ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे अशा शब्दांत नसिरसाहेबांनी या कलाकारांच्या अभिनयाला पोचपावती दिली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत.संगीत देवबाभळी या नाटकाचा प्रयोग मुंबईत लागल्यास त्याला पुन्हा एकदा हजेरी लावेन आणि त्यावेळी सोबत मित्रांनाही घेऊन येईल अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी या कलाकारांना दिली.संगीत देवबाभळी हे संत तुकाराम आणि विठू माऊली यांच्यातलं नातं सांगणारं नाटक आहे. तरीही नाटकात तुकोबा किंवा विठ्ठल नाही. देव आणि भक्त यांच्या पत्नींच्या माध्यमातून उलगडणारं हे नाटक आहे. हे दोन पात्री नाटक प्राजक्त देशमुख यांनी दिग्दर्शित केले आहे. खरं तर दोन कलाकारांचं नाटक आहे.आवलीच्या भूमिकेत शुभांगी सदावर्ते आणि रुक्मिणीच्या भूमिकेत मानसी जोशी. या दोघींनी आपापल्या भूमिकांना पूर्णपणे न्याय दिला असून समर्थ अभिनयाने त्या रसिकांसमोर मांडण्यात यशस्वी झाल्या आहेत.महत्त्वाचे म्हणेज रंगमंचावर नसणारी पात्रं विठोबा आणि संत तुकाराम यांचा आभास निर्माण करण्यात या दोघीही यशस्वी झाल्या आहेत.त्यामुळेच की काय सर्वसामान्य नाट्यरसिकांसह नसिरुद्दीन शाह यांच्यासारख्या रंगभूमी गाजवणा-या दिग्गज अभिनेत्यालाही संगीत देवबाभळी या नाटकानं आणि शुभांगी सदावर्ते तसंच मानसी जोशी यांच्या अभिनयाने भुरळ घातली आहे. रंगभूमीची उत्तम जाण असणारे आणि रंगभूमीवर स्वतः काम केलेले तसंच सिनेमांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अष्टपैलू अभिनेता अशी नसिरुद्दीन शाह यांची ओळख.इतक्या बड्या कलाकाराकडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर संगीत देवबाभळी या नाटकातील कलाकारांची अवस्था आज मैं ऊपर अशी काहीशी झाली असणार यांत शंका नाही. 

Also Read: शूटिंग हिंदी सिनेमाचं,पण या गोष्टीवरुन सोनाली आणि या बड्या स्टारमध्ये निर्माण झाला जिव्हाळा

Web Title: Naseeruddin Shah, who was honored by Devbabali drama in music, said,
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.