Nana Patekar's explosion on 'Padmavat' | ‘पद्मावत’वरून नाना पाटेकर यांचा भडका

‘चुकीचा चित्रपट बनवाल तर लोक रिअ‍ॅक्ट करणारच’ असे वक्तव्य करून ‘पद्मावत’ला विरोधाचा सूर आवळणारे अभिनेते नाना पाटेकर यांचा आता मात्र ‘पद्मावत’वरून चांगलाच भडका झाल्याचे दिसून आले. ‘पद्मावत’बद्दल भूमिका मांडणाºया नानाला जेव्हा ‘अय्यारी’ अन् ‘मणिकर्णिका’ या चित्रपटांना होत असलेल्या विरोधाबद्दल तुमची भूमिका काय? असे विचारण्यात आले तेव्हा मात्र नानांचा चांगलाच संताप झाला. त्यांनी या चित्रपटांबद्दल भूमिका तर मांडली नाहीच, उलट ‘पद्मावत’बद्दलही बोलणे टाळले. 

नाना पाटेकर त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 
नाशिक येथे आले होते. पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी मोजक्याच अन् त्यातही राजकारणावर टीका करता येईल याच प्रश्नांची उत्तरे देणे पसंत केले. तर अडचणीत आणणाºया प्रश्नांना आपल्या स्वभावाने बगल दिली. राजकारणावर बोलताना त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर निशाणा साधताना जातीपातीचे विषारी राजकारण करून तरुणाईला भरकटविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले. खूप शिक्षण घेऊन नोकºया मिळत नसलेल्या वैफल्यग्रस्त तरुणाईला आपल्या जाळ्यात ओढण्याचा किळसवाणा प्रकार राजकारण्यांकडून केला जात आहे. त्यामुळे तरुणांनी ही राजकीय लालसा ओळखायला हवी. ३० वरून १३० कोटी लोकसंख्या वाढली आहे. त्या तुलनेत नोकºयाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. त्यामुळे याचा शेवट कुठे होईल हे सांगणे मुश्किल आहे. पुढच्या पिढीच्या वाट्याला तर आपण काय ठेवून जावे याबद्दल चिंता वाटत असल्याचेही नानाने म्हटले. यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे उपस्थित होते. 

दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटाला देशभरात प्रचंड विरोध होत असताना चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच कलाकार चित्रपटाच्या बाजूने ठामपणे उभे राहताना दिसले. मात्र नाना पाटेकर यांनी विरोधाचा सूर व्यक्त करीत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा त्यांचा एक व्हिडीओ इंटरनेटवर अजूनही व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ते म्हणत आहे की, ‘हल्ली चित्रपटाला विरोध होणे सामान्य बाब झाली आहे. चित्रपटाला सेन्सॉरकडून हिरवा कंदील दाखविला गेला म्हणजे चित्रपट प्रदर्शित होणारच. मात्र अशातही आपण योग्य विषय घेऊन चित्रपटाची निर्मिती करायला हवी. जर तुम्ही योग्य चित्रपट बनविला तर लोक रिअ‍ॅक्ट करणार नाही. मात्र तुम्ही चुकीचा चित्रपट बनविला तर लोक नक्कीच रिअ‍ॅक्ट करतील.’ मात्र आता नाना त्यांच्या या भूमिकेवरून घूमजाव करताना दिसून आले. प्रमोशनला नकार मात्र...
नाना पाटेकर गेल्या काही दिवसांपासून प्रमोशन करण्यास नकार देताना दिसत आहेत. इंडस्ट्रीत एवढे चित्रपट करूनही जर प्रमोशन करावे लागत असेल तर आपण काय कमाविले? असा सवाल उपस्थित करताना प्रमोशनला विरोध असल्याचे ते ठामपणे सांगताना दिसत आहेत. मात्र त्याचबरोबर ते चित्रपटाचे जागोजागी प्रमोशन करताना दिसत असल्याने, त्यांची भूमिका संभ्रमात टाकत आहे. 

तरुणांनो सावध राहा
राजकारणात स्वतंत्र अस्तित्व नसणारे जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी जाती नव्हत्या का, मग या दंगली अचानक कशा होत आहेत. हे सर्व अचानक घडलं नाही. अशी शंका त्यानं उपस्थित केली. जे सत्तेत नाहीत, त्यांनी वातावरण गढूळ करू नये. कोणते लोक राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे वेळीच ओळखावे. 
Web Title: Nana Patekar's explosion on 'Padmavat'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.