Nana Patekar, the first time ever to do the untoward work, is to read the details | आज पर्यंत कधीही न केलेलं काम पहिल्यांदाच करणार नाना पाटेकर,जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

आपला मानूस या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासूनच त्याच्या कथेबाबत बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.सिनेमाचं रहस्य काय असणार याबाबत रसिकांची उत्कंठा वाढली आहे.त्यातच या सिनेमात एक मोठं सरप्राईज असेल आणि हे रसिकांना हे सरप्राईज निश्चितच हादरुन टाकेल असं अभिनेता नाना पाटेकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. त्यामुळेच आपला मानूस सिनेमाची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.तेव्हापासूनच हे सरप्राईज नक्की काय असेल हे शोधण्याचाप्रयत्न सुरु झाला.याच शोधा दरम्यान एक सुखद बाब समोर आली आहे.आपला मानूस या सिनेमाची कथा मराठी रंगभूमी गाजवणारे नाटक ‘काटकोण त्रिकोण’वर आधारित आहे.विवेक बेळे दिग्दर्शित या नाटकाची कथा ४ व्यक्तीरेखांभोवती फिरते.प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेता डॉ. मोहन आगाशे यांनी या नाटकात पोलिसाची भूमिका साकारली होती.याशिवाय नाटकात ज्या आरोपीचा शोध सुरु असतो त्या गुन्हेगाराच्या वडिलाची भूमिकाही डॉ. आगाशे यांनी साकारली होती.याचाच अर्थ या नाटकात डॉ.मोहन आगाशे यांनी या नाटकात आबा आणि पोलीस अशी दुहेरी भूमिका साकारली होती.जर आपला मानूस सिनेमाची कथा या नाटकावर आधारित आहे आणि यांत अभिनेता नाना पाटेकर यांनी पोलीस साकारला आहे.तर या कथेतील आरोपीच्या वडिलांच्या भूमिकेतही नानाच असणार.त्यामुळेत आपला मानूस या सिनेमात नाना पाटेकर यांचा डबल रोल असणार आणि हेच या सिनेमाचे सगळ्यात मोठं सरप्राईज असेल.कारण आजवर नाना पाटेकर यांनी कधीही डबल रोल रुपेरी पडद्यावर साकारला नसून ते आपला मानूस या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा घडणार आहे. 

Also Read:असा आहे 'आपला मानूस' सिनेमाचा ट्रेलर

अजय देवगण निर्मित 'आपला मानूस' या मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून तो २०१८ मधील प्रमुख आकर्षण ठरला आहे.चित्रपटामधील उत्तम कलाकार व त्याला जोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.आपला मानूस चित्रपटाच्या टीझरला १.५ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत असून याच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच आकर्षित केले होते.नाना पाटेकर,सुमित राघवन आणि ईरावती हर्षे या कलाकारांसह नुकत्याच झालेल्या एका समारंभात निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला.
Web Title: Nana Patekar, the first time ever to do the untoward work, is to read the details
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.