आपल्या आवडत्या कलाकारांच्या ख-या आयुष्यातील सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. म्हणून आज आपण सगळ्यांचा लाडका पुष्कर जोगच्या वेडींग अल्बमवर नजर टाकणार आहोत. सोशल मीडियावर पुष्करच्या लग्नाच्या खास फोटोंना खूप पंसती मिळत आहे.काही वर्षांपूर्वी पुष्कर आणि जास्मिन रेशीमगाठीत अडकले.  जास्मिनचा अभिनयाशी काहीही संबंध नसून ती एअर होस्टेस आहे. एका प्रवासातच या दोघांची लव्ह स्टोरी रंगली आणि दोघांनी जन्मोजन्मीचे जोडीदार होण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांनी अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं.पुष्करच्या लग्नाविषयी चित्रपटसृष्टीतील त्याच्या बऱ्याच मित्रांनाही माहिती नव्हती. त्यामुळं अत्यंत खासगी पद्धतीने पार पडलेल्या पुष्कर आणि  जास्मिनच्या लग्नाचे काही खास फोटो व्हायरल होत असून दोघेही मेड फॉर इच अदर असल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे.जन्मोजन्मीचे सोबती बनण्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसतोय.विशेष म्हणजे सध्या वेडींग सिझन सुरू असल्यामुळे अनेक मुलींना त्यांच्या लग्नात अगदी जास्मिन प्रमाणेच दिसावे अशी इच्छा बाळगताना दिसतायेत. नुकताच मराठी बिग बॉसच्या घरात स्टॅच्यू आणि रिलीज हा टास्क पार पडला. या टास्कच्या निमित्ताने कलाकारांना आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली. प्रत्येक स्पर्धकाच्या घरातील कुणी ना कुणी सदस्य बिग बॉसच्या घरात आला. यावेळी सगळ्यात लक्षवेधी ठरले ते पुष्कर जोगची पत्नी जॅसमिन आणि त्याच्या बाळाची एंट्री. जास्मिनचा  ग्लॅमरस अंदाज पाहून रसिकांसह बिग बॉसच्या घरातील स्पर्धकसुद्धा थक्क झाले.मराठी बिग बॉस हा रिअॅलिटी शो दिवसेंदिवस रसिकांचा आवडता शो बनत चालला आहे.बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वाद, कुरघोडीची स्पर्धा, डावपेच, टास्क आणि कधी इमोशनल ड्रामा यामुळे रसिकांना हा शो भावतोय. Web Title: MUST SEE: Have you ever seen these photos of Pushkar Jog and his glamorous wife Jasmin?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.