The Musical Lovestory 'Musical Love' | म्युजिकल लव्हस्टोरी 'तुझीच रे'चा मुहूर्त संपन्न

आयुष्यात एकदा तरी आपण प्रेमात नक्कीच कुणाच्या तरी प्रेमात पडतो.प्रेम ही भावनाच तशी आहे.कधी, केव्हा, कसे आणि कुणावर आपले प्रेम जडेल हे सांगता येणार नाही. इजाबेला म्युजिक आणि एंटरटेनमेंट निर्मितीसंस्थे अंतर्गत,बेला सॅमसन ग्रेशीयस निर्मित अशाच प्रेमाची नवीन परिभाषा सांगणाऱ्या तुझीच रे...या संगीतमय मराठी प्रेमपटाचा मुहूर्त नुकताच वसई येथे पार पडला. मान सन्मान,भैरू पैलवान की जय अशा सिनेमांचे दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.सिनेमात 'अगं बाई अरेच्चा' फेम प्रियांका यादव, सुमुखी पेंडसे, मिलिंद गवळी, अक्षय कांबळी, सिद्धांत इनकर, आनंदा कारेकर, प्रतिभा शिंपी आणि जयु चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे, सिनेमाबद्दल सांगतात कि,आजवर आपण अनेक म्युजीकल लव्ह स्टोरीज बघितल्या असणार...पण हा सिनेमा खरंच वेगळा आहे कारण,एकतर आपण पुरुष प्रधान संस्कृतीत वावरत असल्याने प्रेमी युगालात एखाद्या प्रेयसीने प्रेमात पुढाकार घेणे फारसे घडत नाही..आणि तसे घडले तरी ते आपण झटकन स्वीकारत नाही. ज्या प्रेमाच्या भावना पुरुषामध्ये जागृत होऊन तो त्या जाहीररीत्या व्यक्त करू शकतो तर एक मुलगी का नाही करू शकत यावरच हा सिनेमा बेतलेला आहे. हा सिनेमा म्हणजे संगीतमय प्रेमकथा आहे.प्रियांका यादव सांगते कि,सिनेमात मी शालू नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. गावात राहणाऱ्या पाटलाची ही मुलगी आहे. चांगलं आणि वाईट याची चांगली पारख तिला आहे.नात्यांमध्ये तिला प्रेम अधिक महत्वाचं आहे.आपल्या प्रेमासाठी वाट्टेल ते करणारी ही शालू आपलं प्रेम मिळवण्यासाठी काय करते याचा प्रवास म्हणजे हा सिनेमा आहे. कथा सॅमसन ग्रेशीयस,पटकथा सुरेश बाल्मिकी,सवांद अजय राणे, गीते सॅमसन ग्रेशीयस आणि सागर खेडेकर यांची आहेत.कला दिग्दर्शन केशव ठाकूर, संकलन दिनेश मेंगडे, छायांकन राजा फडतरे यांचे आहे तर सिनेमाला फ्रान्सिस जिगुल यांचे संगीत लाभले आहे.सिनेमात एकूण चार गाणी आहेत.संपूर्ण चित्रीकरण हे वसई आणि आसपासच्या परिसरात सुरु झाले आहे.  

Web Title: The Musical Lovestory 'Musical Love'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.