Music Launch of the Hour Film | घंटा चित्रपटाचे म्युझिक लाँन्च

शैलेश काळे दिग्दर्शित घंटा या चित्रपटाचे नुकेच म्युझिक लाँच करण्यात आले आहे. अमेय, सक्षम आणि आरोह यांनी सादर केलेल्या धमाल मोशन पोस्टरने 'घंटा'च्या प्रमोशनला प्रारंभ झाला होता. सगळीकडे चर्चा असलेल्या घंटा या धमाल विनोदी चित्रपटाचे म्युझिक आणि ट्रेलर अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत लांँच करण्यात आले. महेश मांजरेकर, संजय मोने, जीतेंद्र जोशी, अमृता खानिवलकर आदि कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर 'घंटा' टीमने 'घंटा-टोस्ट' हा छोटेखानी कार्यक्रमदेखील सादर करत चित्रपटाचा ट्रेलर, तसेच म्युझिक व्हिडिओ लॉंच करत धमाल उडवून दिली. तसेच शैलेश काळे आणि रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुमित बोनकर आणि राहुल यशोद यांनी या हटके सिनेमाचं लेखन केलं आहे. या चित्रपटासाठी  प्रेक्षकांना १४ आॅक्टोबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Music Launch of the Hour Film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.