Much awaited Bhau kadam Nashibvaan movies trailer is out! | भाऊ कदमच्या 'नशीबवान'चा दमदार ट्रेलर आऊट
भाऊ कदमच्या 'नशीबवान'चा दमदार ट्रेलर आऊट

ठळक मुद्देया चित्रपटात भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे

'कॉमेडीकिंग' भाऊ कदम यांच्या 'नशीबवान'चं पोस्टर लाँच झालं तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, की या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार...?  ही प्रतीक्षा अखेर संपली असून'नशीबवान' चा जबरदस्त ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. ट्रेलरवरून तरी या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, असं दिसतंय. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत. अचानक त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं आणि त्याचं नशीबच पालटून जातं. भौतिक सुखाचा आनंद उपभोगत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतानाही या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.

भाऊ कदम यांच्या अफलातून अभिनयासोबतच, त्यांचे  खुसखुशीत विनोदही प्रेक्षकांना खदखदून हसवणारे आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण रहदारीच्या ठिकाणी केल्यामुळे हा चित्रपट अतिशय वास्तववादी वाटतोय. शिवाय या चित्रपटात कलाकारांना अतिशय नैसर्गिक रूपात दाखवण्यात आले आहे, त्यांना मेकअपही केलेला नाही. कुठेही दिखाऊपणा, झगमगाट न दाखवता अतिशय सरळ पद्धतीनं या चित्रपटाची मांडणी केली आहे. भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांसारख्या दमदार अभिनेत्री या चित्रपटात आहेत. या जबरदस्त ट्रेलरवरून चित्रपटही एकदम झकास असेल यात शंका नाही. 

फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची  प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले असून, सिनेमाचे  निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे आहेत. सोबतच प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

English summary :
Nashibvaan marathi movie: The trailer of comedian 'Bhau Kadam's movie Nashibawan' was launched. This movie produced by Flying God Films and Giri Media Factory, the film will released on January 11. This film has been directed by Amol Vasant Gol and the producers of the film are Amit Naresh Patil, Vinod Manohar Gaikwad and Mahendra Gangadhar Patil.


Web Title: Much awaited Bhau kadam Nashibvaan movies trailer is out!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.