This movie is only for you on July 22 | फक्त तुझ्याचसाठी हा चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित

  प्यारेलाल शर्मा आणि जगन्नाथ रंगधोप दिग्दर्शित फक्त तुझ्यासाठीच या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाचा लागली आहे. पण या चित्रपटासाठी आपल्याला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. १७ जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता, २२ जुलैला प्रदर्शित होणार आहे. कारण या चित्रपटासाठी खूप कमी ठिकाणी थिएटरर्स उपलब्ध होत होते. तसेच आम्हाला हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांपर्यत पोहचवायचा आहे. त्यामुळे हा चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे चित्रपटाचे निर्माते स्वपन रे यांनी लोकमत सीएनएक्सला सांगितले. तसेच हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्याने प्रत्येकालाच या चित्रपटाची उत्सुकता लागली असणार हे नक्की. तसेच या चित्रपटात सिया पाटील, यश कपूर, लीना बी, अंकिता तारे या आदि कलाकारांचा समावेश आहे.
Web Title: This movie is only for you on July 22
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.