Milind Gawli's daughter got married ... Many celebrities from the Marathi industry have brought laurels | ​मिलिंद गवळी यांच्या मुलीचे झाले लग्न... मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रेटींनी लावली हजेरी

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहरे लग्नबंधनात अडकली. तिने दिग्दर्शक अभिषेक जावकरसह लग्न केले. प्रार्थनाच्या लग्नानंतर काहीच दिवसांत अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत लग्नबंधनात अडकला. त्याने पूर्वा पंडित या त्याच्या मैत्रिणीशी गाजतवाजत लग्न केले. निर्मिती सावंत यांच्या मुलानंतर आता आणखी एका मराठी सेलिब्रेटीच्या मुलीचा विवाह झाला आहे. मिलिंद गवळी यांची मुलगी मिथिला गवळीचे नुकतेच लग्न झाले असून तिच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. मिथालीचे लग्न धुमधडाक्यात झाले असून या लग्नात सेलिब्रेटी मस्तीच्या मुडममध्ये दिसले.
मिलिंद गवळी गेली अनेक वर्षं अभिनयक्षेत्रात आहेत. त्यामुळे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे अनेक मित्रमैत्रिणी आहेत. मिलिंद आणि अलका कुबल यांनी तर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अलका कुबल सार्वजनिक कार्यक्रमात खूपच कमी पाहायला मिळतात. पण त्यांनी या लग्नाला आवर्जून उपस्थिती लावली होती. याचसोबत या लग्नाला स्मिता जयकर, अर्चना नेवरेकर, आशालता वाबगावकर आणि ज्योती जोशी या अभिनेत्री देखील उपस्थित होत्या. मुंबईत झालेल्या या लग्नात या सगळ्या अभिनेत्री हातावर मेहेंदी काढताना दिसल्या. 
मिलिंद गवळी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील आपले भाग्य आजमावले आहे. शूर आम्ही सरदार, हे खेळ नशिबाचे, आधार, वैभव लक्ष्मी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच चंचल, वक्त से पहेले, हो सकता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये मिलिंद गवळी झळकले आहेत. हिंदीमध्ये त्यांनी कॅम्पस, सीआयडी, आहट, कहानी तेरी मेरी यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांना आजवर त्याच्या भूमिकांसाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. मुलीच्या लग्नात त्यांनी काही वेळासाठी कुर्ता-पायझमा घातला होता तर रिसेप्शनला ते शेरवानीत दिसले.  

Also Read : ​अलका कुबल सांगतायेत माहरेची साडी या चित्रपटाच्या सिक्वलसाठी हीच अभिनेत्री योग्य

Web Title: Milind Gawli's daughter got married ... Many celebrities from the Marathi industry have brought laurels
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.