#MeToo Boxing Gloves at Sai Tamhankar! | #MeToo म्हणून सई ताम्हणकरच्या हाती बॉक्सिंग ग्लब्ज!

गेल्या काही दिवसांपासून जगभरातील माध्यमांमध्ये हॉलिवूड निर्माते हार्वी वीनस्टीन यांचे प्रकरण चांगलेच गाजतंय.हॉलिवूडमधल्या अनेक बड्या अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा विषय किती गंभीर आहे,याकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर #MeToo हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.हा हॅशटॅग वापरून सध्या अनेकजण आपल्या आयष्यातील कटू अनुभवांबद्दल सांगत आहेत.केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटी देखील पुढे येऊन आपल्या आयुष्यातील अनुभव मांडत आहेत.तरच या परिस्थितीमध्ये सई ताम्हणकरचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.सई ताम्हणकरची चपळता आणि हा बॉक्सिंग अंदाज पाहून महिलांशी पंगा घेणं चांगलंच महागात पडू शकतं आता समोर कुणीही येवो.त्याचा मुकाबला करण्यासाठी सा-याच महिला रेडी आहेत जणू हेच सांगण्याचा प्रयत्न सईच्या फोटोतून पाहायाला मिळतोय.सध्या देशात महिलांवर अत्याचाराच्या घटना दरदिवशी ऐकायला मिळतायत.अशा परिस्थितीत स्वतःच्या रक्षणाचा फंडाही सई महिलांना देत असल्याचे पाहायला मिळतोय.

सई ताम्हणकरने 'दुनियादारी','बालक पालक','नो एंट्री पुढे धोका आहे' यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.आज मराठी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.तिने मराठी चित्रपटांसोबतच 'गजनी', 'हंटर' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.'हंटर' या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर ती आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळली आहे.लवकरच ती सोलो या दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.'सोलो' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करून सईनेच तिच्या फॅन्सना ही आनंदाची बातमी दिली होती. हा चित्रपट मल्याळम आणि तामिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.'सोलो' हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजोय नामदार यांनी केले आहे तर डलकर सलमानची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. सोलो या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करून सईनेच तिच्या फॅन्सना ही आनंदाची बातमी दिली होती. त्याचसोबत डिनो मोरिया,नेहा शर्मा हे बॉलिवूडमधील कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत.

Web Title: #MeToo Boxing Gloves at Sai Tamhankar!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.