Meet the audience soon for 'what to do' | 'हिच्यासाठी काय' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

तुमचं सर्व चांगलं होणार आहे..तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी मिळणार आहे...रूपवान गुणवान अशी बायको तुम्हाला मिळणार आहे..असं सर्व काही तुमच्या आयुष्यात आपोआप होणार आहे असं कुणी तुम्हाला भविष्य वर्तवले तर काही वेळ तुम्ही सुद्धा स्वप्नमय जगात वावरू लागतात..अशाच प्रकारचे कथानक असलेला आराध्य फिल्म्स निर्मित, मिलिंद दास्ताने दिग्दर्शित हिच्यासाठी काय पण हा मराठी सिनेमा १३ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सिनेमात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, निर्मिती सावंत आणि विजय चव्हाण अशा एक से बढकर एक विनोदवीर कलाकारांच्या भूमिका आहेत. सिनेमाच्या कार्यकारी निर्मात्या उज्वला पोळ. तर संगीतकार हर्षित अभिराज आहेत.

हिच्यासाठी काय पण ही कथा आहे, एका छोट्या गावात राहणाऱ्या किसना या मुलाची. ज्याचे आयुष्य तो एकदम आनंदात जगतोय. सर्व काही आपोआपच भेटणार आहे असं त्याने गृहीत धरले आहे आणि तसाच तो जगत असतो. त्याच्या आयुष्यात येणारी प्रिया म्हणजेच भार्गवी चिरमुले त्याला वास्तवतेची जाणीव करून पटवून देते कि, आपण भविष्यावर अवलंबून न राहता, स्वतःच्या कर्तुत्वावर आयुष्य जगलं पाहिजे..आणि मग पुढे किसना हा प्रियासाठी म्हणून स्वत:च्या हिमतीवर काय काय करतो याचा प्रवास म्हणजे हिच्यासाठी काय पण.

सिनेमात कुशल बद्रिके, एक ढोंगी बाबाच्या भूमिकेत आहेत. भारत गणेशपुरे हे भविष्य सांगणारे गृहस्थ साकारत आहेत. या दोघांच्या दृश्यात विनोदाची अस्सल मेजवानी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. शिवाय विजू मामा आणि निर्मिती सावंत यांची जुगलबंदी देखील सिनेमाची महत्वाची बाजू आहे. सिनेमात दोन गाणी आहेत. श्रद्धा असणे आणि अंधश्रद्धा असणे यातला फरक सिनेमातून दिग्दर्शक मिलिंद दास्ताने यांनी दाखवला आहे. विनोदी अंगाने जाणारा हा सिनेमा नकळत काही सांगून जातो.
Web Title: Meet the audience soon for 'what to do'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.