Before marrying Ashutosh Rana, Renuka Shahane had married | ​आशुतोष राणासोबत लग्न करण्याआधी रेणुका शहाणेचे झाले होते लग्न

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. आज त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाली असून त्यांना दोन मुले देखील आहेत. खूपच कमी जणांना माहिती आहे की, आशुतोष सोबत लग्न होण्याआधी रेणुकाचे लग्न झालेले होते. रेणुकाने प्रेमविवाह केला होता. पण काहीच महिन्यात त्या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. पहिले लग्न तुटल्यानंतर काहीच वर्षांत रेणुकाच्या आयुष्यात आशुतोष आला. हंसल मेहता यांच्या एका चित्रपटाच्या ट्रायलच्यावेळी आशुतोष अभिनेत्री राजेश्वरी सचदेवसोबत आला होता. आशुतोष आणि रेणुका या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. याच वेळी राजेश्वरीने रेणुका आणि आशुतोष यांची ओळख करून दिली. पण त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात देखील नव्हते. पण काहीच महिन्यांनी आशुतोषने दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने रेणुकाला फोन केला. त्यानंतर त्यांच्यात फोनवर बोलणे, भेटणे सुरू झाले आणि त्यानंतर काहीच महिन्यात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचा देखील एक गंमतीदार किस्सा आहे. आशुतोष हा मुळचा मध्यप्रदेशचा आहे. मध्यप्रदेश मधील त्यांच्या गावात त्यांचे लग्न झाले. रेणुका लग्नासाठी ट्रेनने गेली होती. त्यावेळी स्टेशनवर घ्यायला तिला कमीत कमी दीड हजार लोक आले होते. त्यांच्या लग्नाला तर इतकी गर्दी होती की, या गर्दीमुळे रेणुकाचे आई वडील लग्नाच्या ठिकाणापर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी तिचे कन्यादान तिच्या नणंदेने केले. 
रेणुका आणि आशुतोष हे दोघेही खूप चांगले कलाकार आहेत. त्यांनी दोघांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. रेणुकाने हम आपके है कौन या चित्रपटात साकारलेली पूजा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. आजही या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक केले जाते. रेणुकाने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सैलाब, इम्तिहान यांसारख्या हिंदी मालिकेतील तिच्या भूमिकांचे आजही कौतुक केले जाते. आशुतोष राणाने दुश्मन या चित्रपटात साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्याने जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

Also Read : Padmavat पेक्षा या गोष्टी 'बॅन'करण्याची गरज- रेणुका शहाणे

 
Web Title: Before marrying Ashutosh Rana, Renuka Shahane had married
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.