'Marathon Zindagi' for the disabled | ​अपंगांचा जोश ‘मॅरेथॉन झिंदगी’

आयुष्य हे खूप सुंदर आहे. ते निर्विकारपणे जगणे महत्त्वाचे. हातपाय सलामत असलेले लोकांचे ठीक पण जे अपंग आहेत त्यांचे काय?

शरीराने खचलेले अपंग मनाने खचतात का? त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असतो? अशा प्रश्नांची उत्तरे शोधणारा चित्रपट ‘मॅरेथॉन झिंदगी’ लवकर प्रदर्शित होत आहे.

शकिर शेख आणि इनायत शेख दिग्दर्शित या चित्रपटात अकरा अपंग मित्रांची कहाणी मांडण्यात आली आहे. अपंग असुनही आयुष्याशी दोन हात करण्याच्या त्यांच्या उमेदाची ही गोष्ट आहे.

चित्रपटात विक्रम गोखले, संजय नार्वेकर, सुशिला भोसले, सीमा कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. शकिर शेखने पटकथा तर संदीप योगेशने संगीत दिले आहे.
Web Title: 'Marathon Zindagi' for the disabled
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.