Marathmoli 'Apsara' Sonali Ready to Mingal, but it's a condition .... | मराठमोळी ‘अप्सरा’ सोनाली रेडी टू मिंगल, मात्र तिची आहे ही एक अट….

सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. गेल्या काही महिन्यांत अनुष्का शर्मापासून ते प्रार्थना बेहेरे तर अमेय वाघ आणि शशांक केतकर असे रसिकांचे लाडके कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला लग्नाचे वेध लागले आहेत. या अभिनेत्रीचं नाव आहे सोनाली कुलकर्णी. मराठी सिनेसृष्टीची अप्सरा नावाने प्रसिद्ध असलेल्या सोनालीनंही लग्नाची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र सोनालीला तिचं लग्न सर्वसामान्यपणे नाही तर थोडं हटके पद्धतीने व्हावं असं वाटतंय. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नप्रमाणे आपलंही लग्न राजेशाही थाटात व्हावं असं सोनालीला वाटतंय. विराट आणि अनुष्काच्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली. या दोघांच्या लग्नप्रमाणे आपलंही लग्न व्हावं अशी स्वप्नं प्रत्येक विवाहोच्छुक पाहू लागला. अनेक मुलींनी आपले लग्न देखील असेच व्हावे अशी स्वप्न रंगविली आहेत. यांत सोनाली कुलकर्णीचाही समावेश आहे. सोनालीला देखील विराट-अनुष्कासारखे ‘स्वप्नवत’असे लग्न करायचं आहे.मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांची लग्न गेल्या काही महिन्यांत झालीत. त्यामुळे आपल्यालाही लग्न कधी करणार अशी विचारणा होऊ लागल्याची प्रांजळ कबुली तिने दिली आहे. आपला विवाह संस्थेवरविश्वास असून मित्र मैत्रिणींकडे पाहून आपल्याला लग्न करावंसं वाटतं असं सोनालीने सांगितले आहे. मात्र हे लग्न जगावेगळे म्हणजे किमान विराट-अनुष्काच्या लग्नाप्रमाणे राजा राणीसारखं असावं असं सोनालीला वाटतंय. एखादा चांगला मुलगा कुणी आयुष्यात आला तर लग्न करु असंही तिने सांगितले आहे. मात्र सध्या तरी आपण सिंगल आहोत हे सांगायलाही ती विसरली नाही.त्यामुळे अप्सरा गर्ल सोनालीचे डाय हार्ट फॅन असलेल्या तरुणांसाठी ही गोष्ट नक्कीच सुखावणारी म्हणावी लागेल.

SEE PICS:सौंदर्याची खाण आहे सोनाली कुलकर्णी,पाहा तिचे खास फोटो​

cnxoldfiles/a>चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या सांजबहरमध्ये खूशबु आणि संग्राम एकत्र काम करता करता दोघांची ओळख झाली.या ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत झालं. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.5 मार्चला हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. मोठ्या थाटात पारंपारीक विवाह पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला.
Web Title: Marathmoli 'Apsara' Sonali Ready to Mingal, but it's a condition ....
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.